देश लुटणाऱ्यांना चौकीदाराची भीती वाटतेय- मोदी
फिर एक बार मोदी सरकार
शिमला: चौकीदार चोर है या काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते गुरुवारी हिमाचल प्रदेशमधील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ज्यांना देश लुटायची सवय होती त्यांना आज देशाच्या चौकीदाराची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते चौकीदाराला शिव्या देत आहेत असे घणाघाती वक्तव्य पंतप्रधानांनी केले.
फिर एक बार मोदी सरकार
अब की बार मोदी सरकार ही घोषणा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने जोरदार लोकप्रिय केली होती. आता २०१९ साठी 'फिर एक बार मोदी सरकार' अशी घोषणा भाजपने दिलीय. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर हॅशटॅग देऊन मतदारांना हे आवाहन केलंय. 'फिर एक बार मोदी सरकार' भाजप समर्थकांनी भाजपला ५ रूपये ते १००० रूपयांपर्यंत देणगी देण्याचं आवाहन करणारं ट्वीट शाह यांनी केले आहे.
कर्जमाफीबाबत मोठ्या घोषणेची शक्यता
नव्या वर्षात शेतकरी कर्जमाफीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, कृषीमंत्री राधामोहन सिंग, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मॅरेथॉन बैठक घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. कृषी कर्जमाफीबाबत बैठकीत मंथन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीआधी विविध स्तरावर कर्जमाफीबाबत डझनभर बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे.