Numerology: मुस्लिमांमध्ये (Muslim) 786 अंकाला फार शुभ मानलं जातं. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही हा संदर्भ दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा क्रमांक पाहिला की, प्रत्येकाच्या मनात हा लकी नंबर असल्याचा विचार येतो. पण खरंच 786 क्रमांकाचा मुस्लीम धर्माशी काही संबंध आहे का? की हा फक्त एक नंबर आहे. 786 क्रमांकासंबंधी प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. मुस्लीम धर्माशी संबंधित लोक या अंकाला फार पवित्र आणि शुभ मानतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात (Hindu Religion) ज्याप्रकारे लोक घराबाहेर शुभ-लाभ (Shubh Labh), स्वास्तिक (Swastika) चिन्ह शुभ प्रतीक म्हणून लावतात. अगदी त्याचप्रमाणे मुस्लीम धर्माशी संबंधित लोक घर आणि दुकानाबाहेर 786 अंक लिहितात. पण या अंकाचा नेमका अर्थ काय? याचा थेट अल्लाहही संबंध आहे की इतरांप्रमाणे एक साधा क्रमांक आहे. जाणून घ्या याबद्दल


बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीमची बेरीज आहे 786 


इस्लाम धर्माशी संबंधित लोक 786 क्रमांकाला बिस्मिल्लाह अर-रहमान अर-रहीमची बेरीज (BISMILLAH AR-RAHMAN AR-RAHEEM) मानतात. 'बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम' उर्दू किंवा अरबी भाषेत लिहिले गेले असेल तर एकूण शब्दांची संख्या 786 आहे.


बिस्मिल्ला अल-रहमान अल-रहीम लिहिण्याचा अर्थ, त्याची एकूण संख्या 786 आहे. त्यामुळे ही संख्या पवित्र मानली जाते. बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीम (Allah) म्हणजे 'अल्लाह' जो अतिशय पवित्र आणि दयाळू आहे. म्हणून बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहिम अल्लाहशी संबंधित आहे. 7+8+6= 21 होतं आणि 21 ची जोड 2+1= 3. तीन हा अंक अनेक धर्मांमध्ये शुभ मानला जातो.


इस्लाममध्ये संख्याशास्त्रात या संयोजनाचा उल्लेख नाही. उलट, लोकांनी काही अरबी अक्षरे जोडून 786 ला इस्लाममध्ये आणलं असं म्हटलं जातं.


मुस्लिम 786 क्रमांकाला सकारात्मकता, नशीब आणि समृद्धीशी देखील जोडतात. घर आणि दुकानात हा नंबर वापरण्याबरोबरच मुस्लिम समाजातील लोक लग्नपत्रिकेतही हा नंबर छापून घेतात. अनेकांना या क्रमांकाची नोट मिळाल्यास ते ती अनमोल समजतात आणि सुरक्षित ठेवतात.


बॉलिवूड चित्रपटांमध्येही 786 चा उल्लेख


अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही 786 क्रमांकाचा उल्लेख कऱण्यात आला आहे. अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) कुलीमधील 'बिल्ला नंबर 786', शाहरुख खानच्या वीर झारा मधला 'कैदी नंबर 786', अक्षय कुमारचा 'खिलाडी 786' इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये हा नंबर वापरला गेला आहे.


786 संख्येबद्दल लोकांमध्ये अनेक मतं, विश्वास आणि कल्पना आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की 786 ही इतर संख्यांप्रमाणेच एक संख्या आहे आणि त्याचा इस्लामशी काहीही संबंध नाही किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख नाही. 


अनेक मुस्लिम धर्मगुरू बिस्मिल्ला ऐवजी 786 लिहिणे केवळ रियाजी भाषा मानतात. पण तरीही अनेक मुस्लिम बिस्मिल्ला ऐवजी 786 क्रमांक लिहितात. याबाबत काही लोकांचा असाही विश्वास आहे की अल्लाहचे नाव पूर्ण आणि पूर्ण उपासनेसह घेतले पाहिजे.