Beer Bottle Colour Fact: तुम्ही कधी बिअरची बाटली पाहिली असेल तर तुम्हाला एक तर हिरव्या किंवा तपकिरी रंगाची पाहिली असेल. बिअर पांढऱ्या किंवा पारदर्शक काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवली जात नाही? असा प्रश्न पडतो. हिरव्या आणि तपकिरी  रंगांच्या बाटलांमध्ये बिअर ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे. हजारो वर्षांपूर्वी पहिली बिअर बनवणारी कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये होती. असं म्हणतात की येथे सुरुवातीला पारदर्शक बाटल्यांमध्ये बिअर दिली जात होती. बिअरमधील अ‍ॅसिड सूर्यप्रकाश आणि अल्ट्रा वॉयलेट रेजमध्ये रिअ‍ॅक्ट होत असल्याचं उत्पादकाच्या निदर्शनास आलं. रिअ‍ॅक्शनमुळे बिअरमधून वास येऊ लागला आणि लोकांनी नापसंती दर्शवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध उपाय शोधण्यात आले. बिअर निर्मात्यांनी बिअरसाठी अशा बाटल्या निवडल्या, ज्यावर तपकिरी कोटिंग होती. यामुळे तपकिरी बाटल्या वापरल्या गेल्या. या रंगाच्या बाटल्यांमध्ये ठेवलेली बिअर खराब झाली नाही. म्हणजेच, सूर्याच्या किरणांचा तपकिरी बाटल्यांवर परिणाम झाला नाही.


Knowledge News: एक Train तयार करण्यासाठी किती खर्च येतो माहिती आहे का? जाणून घ्या


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उत्पादकांसमोर आणखी एक समस्या निर्माण झाली. या काळात तपकिरी बाटल्यांचा दुष्काळ पडला होता. या रंगाच्या बाटल्या उपलब्ध नव्हत्या. अशा स्थितीत बिअर निर्मात्यांना सूर्यकिरणांचा परिणाम होणार नाही असा दुसरा रंग निवडावा लागला. मग हिरवा रंग निवडला. तेव्हापासून बिअर हिरव्या बाटल्यांमध्ये विकली जाऊ लागली.