विमानाच्या काचा गोल का असतात! हे माहीत आहे का?
अनेकांनी दूरचा प्रवास हा विमानाने केला असेल. मात्र, हा विमान प्रवास करताना विमानाने उड्डान केल्यानंतर तुम्ही आकाशातून नेहमी काचेच्या खिडकीतून पृथ्वी कशी दिसते, हे पाहिले असेल. परंतु ज्या खिडकीतून पाहतात, त्या खिडकीच्या काचा गोल का असतात, हा कधी विचार केलाय?
नवी दिल्ली : अनेकांनी दूरचा प्रवास हा विमानाने केला असेल. मात्र, हा विमान प्रवास करताना विमानाने उड्डान केल्यानंतर तुम्ही आकाशातून नेहमी काचेच्या खिडकीतून पृथ्वी कशी दिसते, हे पाहिले असेल. परंतु ज्या खिडकीतून पाहतात, त्या खिडकीच्या काचा गोल का असतात, हा कधी विचार केलाय?
अशा काचा प्रवासात पाहिल्यात?
आपण अनेकवेळा प्रवासाला निघताना बस, रेल्वेचा वापर केला असले. मात्र खिडकीच्या काचा या चौकनी पाहिल्या असतील. मात्र, विमानाच्या काचा चौकनी का नाही, असा कधी प्रश्न तुमच्या मनात तरी आला आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला या प्रश्नाची उत्सुकता हे वाचल्यानंतर कमी होईल.
खिडकी गोलाकारच का?
विमानांच्या खिडकीच्या काचा गोलच का असतात? विमानातील प्रत्येक खिडकी गोलाकारच असण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. १९४९ ला प्रथम व्यावसायिक विमान सेवा सुरु झाली. पण, दोनच वर्षांत विमान अपघात झाला. या विमान अपघाताची चौकशी केली गेली त्यावेळी काही माहीती पुढे आली. विमान ज्यावेळी ३० हजार फूट उंचीवर जाते त्यावेळी वातावरणातील हवेची घनता कमी होत जाते. त्यामुळे विमानच्या आतील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी तो वाढवण्यात येतो. कारण प्रवाशांना श्वास घेता येईल.
विमानाच्या काचा चौकोनी आकार
हे सगळे करीत असताना आतील आणि बाहेरील दबावात मोठी तफावत झाल्याने काच फुटली आणि विमान अपघात झाला. त्या विमानाच्या काचा चौकोनी आकारच्या होत्या. चौकोनी आकाराच्या काचेचे चारही कोपरे कमजोर असतात. यावेळी उच्च दबावात त्यांचा टिकाव लागत नाही.
खिडक्यांच्या काचा गोलाकार
त्यामुळे काच तडकून हवा आत आली आणि अपघात झाला. या अपघातानंतर सगळ्या विमानांच्या खिडकीच्या काचा गोलाकार किंवा अंडाकृती आकारच्या बसवण्यात आल्या. कारण गोलाकार काचेला नाजूक कोपरे नसतात. त्यामुळे हवेच्या दाबावातील तफावतीत गोलाकार काचा टिकाव धरु शकतात. हेच कारण असून विमानच्या खिडक्यांच्या काचा गोलाकार असतात.