Why Banana is Crooked: आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक प्रश्न पडत असतात. त्यातून तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की केळ हे नेहमी वाकडचं (Banana News) असतं? असा प्रश्न पडणं हा साहजिकच आहे परंतु यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. केळ खाण्याचे फायदे हे अनेक आहेत त्यातून आपल्याला फायबर आणि पोटॅशियम (Banana Size) मिळते. यातून आपली पचनक्रियाही सुधारते त्यामुळे आपल्यासाठी केळ खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं चांगले असते. आपण केळ्याचा वापर हा अनेक कारणांसाठी करू शकतो. आपण केळ्याचा शेक तयार करू शकतो किंवा त्याची भाजीही करू शकतो. केळ्याचे अनेक फायदेही आपल्यासाठी खुले आहेत. परंतु केळ वाकडं असण्यामागे एक वैज्ञानिक कारणंही आहे. 


काय आहे वैज्ञानिक कारणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळ्याचे झाड हे पहिल्यांदा पावसाळी जंगलात सापडले होते अशी माहिती काही तज्ञांकडून कळते. कुठल्याही झाडांना योग्य पाणी आणि सुर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. परंतु या जंगलात मात्र केळ्यांच्या झाडांना योग्य तो सुर्यप्रकाश मिळत नव्हता. ज्याचा परिणाम त्या झाडांवर पडू लागला आणि त्यामुळे झाडांची फळं म्हणजे केळी तिरक्या आकाराची तयार झाली. त्यामुळे केळ्यांच्या या प्रकृतीनुसार मग अशी केळी झाडाला लागू लागली. 


हा नेगेटिव्ह जिओट्रोपीझमचा परिणाम आहे का? 


कोणतीही झाडं ही गुरूत्वाकर्षणाच्या उलट्या दिशेनं वाढतात. तुम्हाला माहितीच असेल की केळी ही झाडाला काही एकटी येत नाहीत तर ती घडानं येतात. तेव्हा हा घड जमिनीच्या बाजूनं सरकायला लागतो म्हणजे तो गुरूत्वाकर्षणाच्या दिशेने जमिनीच्या बाजूला खेचला जातो. परंतु नेगेटिव्ह जिओट्रोपीझममुळे (Negetive Geotropism) ही झाडं सुर्याच्या दिशेनं वाढू लागली आणि मग त्यांचा आकार हा वाकडा तयार झाला आहे. असं म्हणतात ही केळ्याची झाडं ही प्रथम मलेशियामध्ये उगवली होती. त्यानंतर हे झाडं जगभरात 150 देशांमध्ये लावले जाते. 


केळी ही तिरकी असण्यामागे मुळातच वैज्ञानिक कारणं आहे. आज केळींच्याही अनेक जाती आहे. त्यातील हिरव्या आणि पिवळ्या केळ्यांचा वापर आपण आपल्या आहारात करतो. त्यासोबत गोड पदार्थांमध्येही केळ्यांचा वापर केला जातो. त्यातून इलायची केळी ही आपल्या सर्वांच्या आवडीची असतात. केळ्यांमध्येही नैसर्गिकरीत्या इलायची कशी निर्माण होते हाही एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जसे की नारळात पाणी निर्माण होते. अशीच अनेक गुपितं पृथ्वीवर आढळतात ज्याची आपल्याला कदाचित माहितीही नसेल. तेव्हा तुम्हालाही ही माहिती जाणून घेऊन गंमत वाटेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)