Ayodhya Lok Sabha : उत्तर प्रदेशमधील अयोध्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Ayodhya Lok Sabha Result) भाजपला मोठा धक्का बसला आहे. अयोध्या लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद (Awadhesh Prasad) विजयी झाले आहेत. तर भाजपाचे लल्लू सिंह (lallu Singh) यांचा मोठा पराभव झाला आहे. ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने लोकसभा निवडणूक लढवली. त्याच राम मंदिराच्या (Ram Madir) अयोध्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पण रामाच्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? याची कारणं समजून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक निकालाचं कारण काय?


राजकीय विश्लेषकांनुसार, अयोध्यामध्ये जातीय समीकरणाच्या मुद्द्यापेक्षा विकासाच्या आणि जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून अयोध्येमधील लोकांच्या मनात नाराजीचं वातावरण होतं. हेच नाराजीचं वातावरण मतांमध्ये दिसून आलं. जनतेने भाजप उमेदवाराला घरचा रस्ता दाखवला. एवढंच नाही तर भाजप उमेदवार लल्लू सिंग यांच्याविरोधात देखील नाराजीचं वातावरण दिसत होतं. तरी देखील भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं. गेल्या 10 वर्षांपासून लल्लू सिंग या जागेवरून खासदार होते. लल्लू सिंग सातत्याने दबाव टाकत असल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपविरोधी वातावरण दिसत होतं.


भाजप नेतृत्वाने स्थानिक लोकांच्या मुद्द्यावर लक्ष दिल्याचं दिसलं नाही. तर लल्लू यादव यांच्या भ्रष्टाचाराचे देखील अनेक आरोप होते. राम मंदिराच्या जमिनीच्या मुद्द्यावरून देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्याचबरोबर जातीय समीकरण देखील या जागेवर महत्त्वाचं ठरलं. अखिलेश यादव यांना दलित मतं वळवण्यात यश आलंय.


दरम्यान, सोनू निगम याने लल्लू सिंग यांच्या पराभवावर भाष्य केलंय. ज्या सरकारने संपूर्ण अयोध्याला बदलून दिलं, विकासाची गंगा त्या ठिकाणी आणली. अयोध्येला चमकवलं आणि नवीन विमानतळ दिलं. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन दिलं. इकोनॉमी झोन बनवलं. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला. अयोध्यावासियो हे लज्जास्पद आहे, असं सोनू निगम यांनी म्हटलं आहे.