Chandrayaan 3 Lander and Rover : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO)नं चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात असून, काही दिवसांनी ते चंद्रावर पोहोचेल. सध्या या चांद्रयानाकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना त्याच्या लँडर आणि रोवरसंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. चांद्रयानातील लँडरला विक्रम असं नाव देण्यात आलं आहे. तर, चंद्राच्या पृष्ठावर ते पोहोचल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या रोवरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वीच्या चांद्रयान मोहिमेला अपयश मिळाल्यामुळं ही नावं यंदाच्या वर्षी कायम ठेवण्यात आलं आहे. या नावांमागं नेमकं कारण काय, याचा विचारही तुम्ही केला नसेल, पण आता मात्र ही बाब जगासमोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयान 2 मोहिमेसाठी निघालं असताना त्यासोबतच विक्रम आणि प्रज्ञान आपलं काम करु शकले नव्हते. थोडक्यात चांद्रयानाशी संबंधित असणाऱ्या लँडर आणि रोवरला काम करता आलं नव्हतं. या मोहिमेला आलेल्या अपयशानं खचून न जाता इस्रोनं नव्या ताकदीनं चांद्रयान 3 तयार केलं. आता हेच चांद्रयान पुरेशा इंधनासह चंद्रावर योग्य ठिकाणी Land करणार आहे. यामध्ये लँडर आणि रोवर महत्त्वाची भूमिका बजावतील. 


कुठून मिळाली नावं? 


लँडरला देण्यात आलेल्या विक्रम या नावाचा संस्कृत अर्थ होतो धाडस किंवा शौर्य. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातील कोणत्याही अंतराळ संशोधन संस्थेनं मोहिम फत्ते करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे ज्यामुळं हा एक मोठा पराक्रम असेल. तर, या नावाच्या माध्यमातून शास्तज्ञ विक्रम साराभाई यांना आदरांजलीसुद्धा वाहण्यात येणार आहे. (Lander and rover)


हेसुद्धा वाचा :या फोटोला का म्हटलं जातंय पृथ्वीचं भविष्य? महाकाय दुर्बिणीनं टीपलेला अवकाशातील भयंकर स्फोट पाहाच


 


संस्कृत भाषेत रोवरला देण्यात आलेल्या प्रज्ञानचाही अतिशय खास अर्थ आहे. बिद्धी आणि विवेक यांच्याशी या नावाचा संबंध जोडला जातो. रोवरमध्ये AI शी संबंधित अतिशय अद्ययावत तंत्राचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळं तो चंद्राच्या पृष्ठावर Chemical Study करु शकेल. हे गुण पाहता त्याला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे. 


लँडर आणि रोवरचं नेमकं काम काय? 


चंद्रावर चांद्रयान 3 यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर लँडर आणि विक्रमचं खरं काम सुरु होणार आहे. जिथं लँड झाल्यानंतर काही क्षणांनीच इस्रोकडे अवकाशातून आणि त्याहूनही चंद्रावरील पहिला फोटो पाठवणार आहे. त्या क्षणापासून ते जोपर्यंत चंद्रावर असेल तोपर्यंत त्याचं काम सुरुच राहील. रोवर चांद्रयानातून साधारण 3 दिवसांनंतर बाहेर पडेल. 


रोवर प्रज्ञान इतका महत्त्वाचा का? 


लँडरमधून लाँच होणारं रोवर प्रज्ञान सौरउर्जेवर चालणार आहे. 6 चाकं असणारं हे अवकाश उपकरण प्रती सेकंद 1 सेमी वेगानं पुढे जात साधारण 500 मीटरपर्यंतचं अंतर ओलांडणार आहे. चंद्राच्या पृष्ठावर रोवर महत्त्वाची माहिती लँडरला पाठवत राहील या माध्यमातून ती माहिती इस्रोपर्यंत येईल. चंद्रावरील एक दिवस किंवा पृथ्वीवरील दिवसाच्या अनुषंगानं रोवर 14 दिवस सक्रिय असेल. सगळी समीकरणं सुयोग्य पद्धतीनं पार पडत असल्यामुळं आता फक्त प्रतीक्षा आहे ती म्हणजे चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याची.