मुंबई : कोणीही व्यक्ती कधी खोटेपणा, किंवा फसवेगिरी करताना दिसलं की आपण किंवा इतरही व्यक्ती त्याचा उल्लेख 420 (चारसोबीस) म्हणून करतो. 'हा तर ना चारसोबीस आहे पक्का...', 'ए चारसोबीसी नको करु बरं...', असं तुमच्याही कानांवर आलं असेलच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी विचार केलाय का, असं का म्हटलं जातं ? 


यामागचं मूळ कारण आहे, भारतीय दंडसंविधानातील कलम 420. चोरी, फसवेगिरी आणि विश्वासघात करणाऱ्यांना पोलीस कलम 420 अन्वये ताब्यात घेतात. 


परिणामी सर्वसामान्य भाषा आणि बोलीभाषेत या कलमाचाच उल्लेख अशा व्यवहारांबद्दल बोलताना 'चारसोबीस' म्हणून केला जातो. ज्यामुळं फसवेगिरी आणि बेईमानीशी हा आकडा जोडला जातो. 


कलम 420 मध्ये नेमकं काय नमूद ? 
कायद्यानुसार कलम 420 अन्वये दाखल केल्या जाणाऱ्या तक्रारी आहेत, कोणा एका व्यक्तीला फसवणं. स्वार्थापोटी दुसऱ्या व्यक्तीशी विश्वासघात करणं. खोट्या स्वाक्षरी , आर्थिक आणि मानसिक दबाव तंत्राचा वापर करत संपत्ती लाटणं, असं करणाऱ्य़ांविरोधात कलम 420 अंतर्गत तक्रार दाखल केली जाते. 


कशी होते सुनावणी ?
सदर प्रकरणांची सुनावणी प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेट न्यायालयात होते. या कलमान्वये दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये दोषी आढळल्यास अशा व्यक्तीस जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा होते.


शिक्षेसोबतच दोषींकडून दंडाची रक्कमही आकारली जाते. सदर प्रकरणी पोलीस स्थानकातून जामीन मिळत नाही. न्यायालयाच्या परवानगीनंतरच पुढील कारवाई होते.