सर्वसामान्य भारतीय मद्य (Whiskey) पाण्याविना पिण्याची कल्पनाही करू शकत नाही. दारू आणि पाणी (Water) सोडा (Soda) यांचे हे अतूट नाते दारू कंपन्यांनाही समजले आहे. कदाचित त्यामुळेच या कंपन्या टीव्ही-वृत्तपत्रांमध्ये दारूच्या जाहिरातींवर बंदी असतानाही पाणी, सोड्याच्या जाहिराती करताना दिसतात. या जाहिरातींमधून त्यांना त्यांचा ब्रॅंड हा त्यांचे लक्ष्य असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण दारूत पाणी मिसळण्याचा ट्रेंड भारतात जरा जास्तच असल्याचे पाहायला मिळते. भारतीय मद्यप्रेमी त्यामध्ये पाणी, सोडा, कोक, ज्यूस मिसळून पित असल्याचे आपण नेहमीच पाहतो.


मात्र सामान्य भारतीयांना थेट फक्त दारू पचवणे सोपे नाही का? सरासरी भारतीय दारुमध्ये पाणी का घालतो? असे प्रश्न उपस्थित होतात.


कॉकटेल इंडिया या यूट्यूब चॅनेलचे संस्थापक संजय घोष उर्फ ​​दादा बारटेंडर यांनी याचे आश्चर्यकारक कारण सांगितले आहे. घोष यांच्या मते, भारतातील अनेक व्हिस्की कंपन्या ते तयार करण्यासाठी मोलॅसिस म्हणजेच उसाच्या मळीचा वापर करतात. रम सहसा मळीपासून बनवली जाते. भारतात यावर सध्या कोणतीही कायदेशीर बंदी चनसल्यामुळे, भारतीय मध्यम व्हिस्कीचे ब्रँड मोल्ट्ससोबतट मळीचाही वापर करतात.


किण्वन प्रक्रियेतून गेल्यानंतर या मळीपासून मद्य तयार केले जाते. बहुतेक IMFL (इंडियन मेड फॉरेन लिकर) चा बेस यातून तयार केला जातो असे मानले जाते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही या भारतीय व्हिस्कींना कोणतेही द्रव न घालता 'नीट' प्याल तेव्हा ती आतड्यांना फाडत गेल्यासारखे वाटते. 


त्यामुळे पाण्यात मिसळून या कडूपणाचा समतोल साधणे ही मद्यप्रेमींसाठी मजबुरी आहे. त्यामुळे महागड्या विदेशी ब्रँडची दारू काहीही न घालता सरळ पिणे सोपे का असते हे समजले असेल.


घोष यांच्या म्हणण्यानुसार व्हिस्की-रम इत्यादींमध्ये पाणी घालण्याचे एक कारण भारतीयांच्या खाण्याच्या सवयी देखील आहेत. त्यांच्या मते, भारतात दारु नेहमीच मसालेदार पदार्थांसोबत प्यायली जाते. या कडूपणा आणि तिखटपणाचा समतोल राखण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. त्याच वेळी, पाण्यामध्ये मिसळलेली व्हिस्की पाण्याप्रमाणे काम करते 


त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त पिण्याच्या नादात आपण ते पिण्यायोग्य बनवतो आणि त्यात भरपूर पाणी, सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादी मिसळतो. जर एखाद्याला फक्त 30 मिली किंवा 60 मिली अल्कोहोल प्यायचे असेल, तर ते पाण्याशिवाय देखील पिऊ शकतात.