Shape of DTH Antenna: गेल्या दोन दशकात टीव्हीत अनेक बदल झाले आहेत. ब्लॅक अँड व्हाईट ते कलर टीव्ही आणि आता स्मार्ट टीव्हीपर्यंतचा प्रवास झाला आहे. टीव्हीच्या या प्रवासात अँटेनाचं महत्त्व अधोरेखित होतं. अँटेनावर कावळा बसल्यानंतर टीव्हीवरचं गेलेलं चित्र आणि त्यासाठी असलेली खटपट बहुतांश लोकांनी अनुभवली आहे. आता लांबलचक अँटेनाची जागा डीटीएचनं घेतली आहे. त्यामुळे टीव्ही चॅनेल्सनी घराघरात एंट्री घेतली. डीटीएच किंवा डिश टीव्हीचा अँटेना पूर्वीच्या अँटेनापेक्षा खूप वेगळा आहे. अँटेनाचा आकार गोल असण्यामागे खास कारण आहे. चौकोनी किंवा इतर कोणत्याही आकारात न बनवण्याचे कारण काय? जाणून घ्या यामागचं कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिश टीव्हीच्या अँटेनाचा आकार जाणूनबुजून गोल बनवला आहे. जेव्हा प्रकाश डिशवर आदळतो तेव्हा परावर्तित होत नाही आणि फोकसवर थांबतो. त्याचप्रमाणे जेव्हा उपग्रहातून येणारे सिग्नल देखील छत्रीवर आदळतात तेव्हा ते फीड हॉर्नवर केंद्रित होतात आणि यामुळे आपल्या टीव्हीवर अनेक प्रकारचे चॅनेल येतात.


Aadhaar Card च्या मागे या कारणासाठी असतो QR Code, व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या महत्त्व


सेट टॉप बॉक्स का वापरला जातो? हा प्रश्न अनेकांना पडतो. सेट टॉप बॉक्स उपग्रहाकडून सिग्नल घेतो. म्हणजे फीड हॉर्न असलेले सिग्नल सेट टॉप बॉक्सपर्यंत पोहोचतात, त्यानंतर सेट टॉप बॉक्स हे सिग्नल डीकोड करतो. ही डीकोड केलेली माहिती आपण सर्व टीव्हीद्वारे पाहतो.