Why Is Snow White: आपल्यापैकी सर्वांना हे ठाऊक आहे की, पाणी गोठल्यास त्यापासून बर्फ तयार होतो. पाण्याचं तपमान शून्य डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून खाली जातं तेव्हा पाण्याचा बर्फ होतो. समुद्रसपाटीपासून आपण जसे जसे वर जातो त्यानुसार तापमान हळूहळू कमी होत जातं. उंच ठिकाणी बर्फ अधिक प्रमाणात सापडतो. मात्र ज्या पाण्यापासून बर्फ बनतो त्याला कोणताच रंग नसतो. मग बर्फाचा रंग पांढरा का असतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? रंग नसलेलं पाणी गोठल्यानंतर बर्फ इतर कोणत्या रंगाचा का निर्माण होत नाही? पाहूयात याममागील खास कारण...


...म्हणून पांढऱ्या रंगाचा दिसतो बर्फ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाण्याला रंग नसतो ही गोष्ट 100 टक्के खरी आहे. पाणी त्याच्या नैसर्गिक स्वरुपात असतं तेव्हा ते द्रव्य स्वरुपात आणि पारदर्शक असतं. सूर्यप्रकाश पडणाऱ्या कोणत्याही वस्तूचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. मात्र पाण्याच्या प्रवाहा प्रमाणे हे प्रतिबिंब अस्थीर असतं आणि पाणी जसं हलचाल करतं त्याप्रमाणे प्रतिबिंबामध्येही फरक दिसतो. मात्र पाण्याचा बर्फ होतो तेव्हा या तरल स्वरुपातील पाण्याचे थर स्थायू अवस्थेत बदलतात आणि ते अधिक टणक होतात. अशा स्थायी अवस्थेतील बर्फावर पडणारं प्रतिबिंब सुद्धा स्थायी स्वरुपाचं असतं. आपण या गोठलेल्या पाण्याकडे पाहताना ते पांढऱ्या रंगाचं आहे असं समजून पाहतो. नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूमध्ये शोधून घेण्याची क्षमता असते. मग तो कोणताही पदार्थ असो किंवा धातू असो. ज्या पद्धतीने सूर्याचा प्रकाश परावर्तित झाल्याने पृथ्वीवरील वेगवेगळ्या वस्तूंना त्यांचा रंग प्राप्त होतो ती गोष्ट बर्फबरोबर घडते.


बर्फ आकाशात पडत असताना रंगहीन असतो


मात्र हे प्रकाश परावर्तित होणं वगैरे सर्वकाही गृहित धरलं तरी मूळ प्रश्न कायम राहतो. तो म्हणजे, पांढराच रंग का? याचं कारण हे आहे की बर्फामध्ये बहुतांशप्रमाणात हवाच असते. ही हवा प्रकाशाच्या जवळपास सर्वच तरंगाना परावर्तित करते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण जेव्हा बर्फवृष्टी होते तेव्हा आकाशातून पडणारा बर्फ हा रंगहीन असतो. मात्र या बर्फावर सूर्याची किरणं पडली की त्यामधून प्रकाश परावर्तित होतो आणि त्यामुळे बर्फ पांढऱ्या रंगाचा दिसू लागतो.


पाण्याला रंग असता तर...


बर्फ तयार होताना अनेकदा पाण्यात असलेल्या वेगवेगळ्या वायूंच्या माध्यमातून बर्फाचे छोटे छोटे बुडबुडे आणि पॉकेट्स तयार होता. त्यामुळेच बर्फाचा रंग पांढरा असतो. आता लाल किंवा इतर रंग का नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागील कारण असं आहे की प्रकाशाचा रंग हा पांढरा असतो. त्यामुळेच आपल्याला बर्फ पांढऱ्या रंगाचा दिसतो. पाण्याला स्वत:चा रंग नसल्याने आपल्याला प्रकाश पडल्यानंतर बर्फ पांढऱ्याच रंगाचा दिसतो. पाण्याला रंग असता तर आपल्याला बर्फ वेगळ्या रंगाचा दिसला असता.