मुंबई : पालक झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या अनेक पट वाढतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करीत असाल. परंतु तुम्हाला असं वाटत राहतं की, आपल्या मुलाने त्याच्या वयाच्या हिशोबाने प्रत्येक गोष्टीत बेस्ट असायला हवे. आपल्या वयाच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत मागे सोडायला हवे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांनी नेहमी हा विचार करायला हवा की, दोन बालकं कधीच एकसारखे असू शकत नाही. तुमच्या अपेक्षांमुळे मुलांना दुःख होतं


जेव्हा पालकांना वाटतं की, त्यांचा पाल्य कोणतेही काम लवकर शिकला आहे. तर ते त्याचं श्रेय पाल्यांच्या इंटेलिजंन्स आणि आपल्या चांगल्या पालकपणाला देतात. परंतु हे खरे नाही.


का बालकांची तुलना करणं योग्य नाही?
आपल्या मुलांची इतरांशी तुलना केल्याने पालक आणि  मुलांमधील नात्यांमध्ये गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. मुलांची नेहमी तुलना केल्याने त्यांच्यांवर विनाकारण दबाव पडतो.


जेव्हा आपल्या पाल्य आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्यावेळी आपले त्यांच्याप्रती व्यवहार बदलायला लागतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये भिती किंवा तणाव वाढतो.


असे कधी गरजेचे नाहीये की, पालकांच्या इच्छा पूर्ण करण्यातच मुलांना आनंद मिळत असेल. असू शकतं की, मुलांचा आनंद कोणत्यातरी दुसऱ्या कामात असेल


मुलांवर विश्वास ठेवा
पालक असण्याच्या नात्याने तुम्ही आपल्या मुलांच्या विकासाबाबत जास्त काळजी करू नका. परंतु अशा गोष्टींवर फोकस करा ज्या मुलांच्या भविष्यासाठी कमी येईल.


जेव्हा मुलगा काही चांगले करीत असेल तेव्हा त्याचे कौतुक करा. पुढे प्रगती करण्यासाठी त्याची हिम्मत वाढवा.


पालकत्वामध्ये प्रेम आणि लाडच नाही तर धैर्य देखील कमी येते. मुलांसोबत भरपूर वेळ घालवा खूप मस्ती करा.


तुलना करणे चूकीचे


जर तुम्ही असे पालक आहात जे आपल्या मुलांची दुसऱ्यांशी तुलना करतात.  तर आताच स्वतःला सांभाळा, सावध व्हा. आपल्या अशा वागण्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्हाला कंटाळून मुलगा दूर जाऊ शकतो. अशामुळे काही मुले चिडचिडे देखील होतात.