5 Stages of Love: प्रेमात सगळेच पडतात. तुमच्या आमच्यातले, सर्वच जणं प्रेमात पडताना दिसतात. त्यामुळे पहिलं प्रेम कुठलाच चुकलेले नाही. आपल्या सगळ्यांना फक्त एवढेच माहिती असते की, आधी ओळख होते मग सानिध्यात वेळ घालवता येतो आणि मग त्यानंतर मैत्री व मग प्रेम. परंतु प्रेमाचेही काही टप्पे असतात. ज्याबद्दल अनेकांना कदाचित माहितीही नसेल. प्रेमाचे असेच काही टप्पे असतात ज्याच्या तिसऱ्या टप्प्यावर गेल्यानंतर प्रेमीयुगूलं युटर्न घेतात. त्यामुळे हा टप्पा ओळखायचा कसा? आणि नक्की यामागील कारणं कोणती आहेत याबद्दल या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की नक्की हा टप्पा का येतो यामागे काय कारणं आहेत आणि अशावेळी आपण काय केले पाहिजे? प्रेमात पडण्यासाठी सर्वच जणं उत्सुक असतात परंतु त्यावेळी हा युटर्न प्रत्येकाला पचवता येतोच असे नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेमात पडण्याची कारणं ही अनेक असतात. कोणी कोणाच्या रूपाच्या प्रेमात पडतं तर कोणी कोणच्या बोलण्याच्या. कोणाला दुसऱ्यांचा स्वभाव जास्त आवडतो तर कुणाला कोणाचा स्वभावही आवडतो. त्यामुळे आपल्याला एका व्यक्तीची कोणतीही गुणवैशिष्ट्यं ही आवडू शकतात आणि दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते. परंतु रिलेशनशिप हे प्रत्येकवेळा वर्कआऊट होतेच असे काही नाही. त्यातून अशी वेळ रिलेशनशिपमध्ये अनेकदा येते जेव्हा रिलेशनशिपच्या एका टप्प्यावर मात्र काहीच कळतं नाही आणि आपल्याला आपलं रिलेशनशिप हे पुढे घेऊन जावेसे वाटत नाही. चला तर मग जाणून घेऊया की नक्की याची कारणं कोणती असावीत? लोकं नक्की कधी युटर्न घेतात.


हेही वाचा - 'अगं किती वेळ श्वास रोखून चालशील...' भुमी पेडणेकरच्या रॅम्प वॉकवर हेटर्सनं साधला निशाणा


असं म्हटलं जातं की प्रेमाचे पाच टप्पे असतात आणि त्या तिसऱ्या टप्प्यावर प्रेमीयुग हे युटर्न घेतात. म्हणजेच आपलं रिलेशनशिप पुढे घेऊन जात नाहीत आणि तिथेच थांबतात. पहिल्यांदा आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी प्रचंड आकर्षण वाटते. त्यामुळे आपण इतर व्यक्तींकडे आकर्षित होतो. प्रेमात पडण्याची भावना ही आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. त्यानंतर नातं जुळायला एक भक्कम पाया उभा राहतो आणि मग सगळेच त्यात आपल्या प्रेमाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा रिलेशनशिपमध्ये काहींना नैराश्यही येते. त्यातून जाणारी व्यक्ती ही आपल्या पार्टनरसोबत डिस्टर्बही होऊ शकते आणि सोबतच त्यांच्या मतभेदही होऊ लागतात. 


त्यातून जर का नात्यात दोष आणि अपुर्णता येऊ लागली की मात्र मग फार मोठ्या प्रमाणात आपल्यालाही नात्यात कटूता निर्माण होते. परंतु जर वेळेचा प्रभाव असेल तर मात्र येथे लोकं आपलं नातं हे संपवूही शकतात. मग यालाच जोडून इतरही अनेक गोष्टी निर्माण होतात जसे की आपल्या नात्यात असुरक्षितता निर्माण होते. सोबतच आपल्या आजूबाजूचे घटकही कारणीभूतही ठरतात. सोबतच संवादाचा अभाव असेल तरीही त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो. नात्यात अवास्तव अपेक्षा वाढू लागल्यावरही अशा गोष्टी कारणीभूत ठरतात आणि मग त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)