Unknown facts about passport photo : आपल्या सर्वांना फिरायला प्रचंड आवडतं. नवनव्या ठिकाणी जाऊन नवनव्या गोष्टी पाहिल्याने आपलं मन रिफ्रेश होतं, आपलं शरीरही रिफ्रेश होतं. अशात परदेशात फिरायचं असल्यास आपल्याला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासते. यातल्या परपोर्टबाबत एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जेंव्हा पासपोर्टसाठी फोटो (photo on passport) देतात तेंव्हा तो फोटो आपल्या कॉलेज किंवा ऑफिस आयडीपेक्षा वेगळा निवडलेला असतो. इतर आयडीवरील फोटो हे जरा हसरे किंवा चष्मा लावलेले असले तरी चालतात. मात्र पासपोर्टवर तसं चालत नाही. पासपोर्टवरील फोटो कधीच हसरा (smiling photo on passport) नसतो किंवा त्यावर चष्मा देखील लावलेला नसतो. जाणून घेऊयात यामागे नेमकं लॉजिक काय आहे?


9/11 दहशतवादी हल्ला आणि तुमच्या पासपोर्टवरील फोटो: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील ट्वीन टॉवरवर दहशतवाद्यांनी हल्ला (9/11 terror attack) चढवला. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. या हल्ल्यानंतर विमानतळांवरील सुरक्षेत अभतपूर्व असे बदल करण्यात आले. केवळ अमेरिकेतील विमानतळांवर नव्हे तर जगभरातील विमानतळांवर हे बदल करण्यात आले. 9/11 दहशतवादी हल्ल्याआधी पासपोर्ट फोटोवर चष्मा लावलेले फोटो चालायचे. मात्र त्यानंतर त्यावरही बंदी आली.


अनेक देशांच्या पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप (Elctronic chip)  बसवलेली असते. या चिपमध्ये तुमचा सर्व बायोमेट्रिक डेटा असतो. तुम्ही विमानतळावर प्रवेश केल्यास त्या कॅमेऱ्यात तुमचा चेहरा टिपला ( face recognition) जातो. हा चेहरा व्यवस्थित टिपता यावा म्हणून तुमचे फोटो हसरे किंवा आडवे किंवा चष्मा लावलेले वापरत नाहीत. 


why smiling photos are not used on passport there is connection of 911 terror attack