न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी का बांधली जाते? 99 % लोकांना उत्तर माहितच नसेल
Concept of Goddess of Justice: सर्वोच्च न्यायालयात असलेल्या न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत. काय आहे या मूर्तीचे वैशिष्ट्यै
Concept of Goddess of Justice: न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. पूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असलेली तुम्ही पाहिली असेलच. पण आता या नवीन मूर्तीत डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर न्यायदेवतेच्या दुसऱ्या हातात असलेली तलवारदेखील हटवण्यात आली असून तिथे संविधान ठेवण्यात आलेले आहे.
न्यायदेवतेच्या मूर्तीची वैशिष्ट्यै
न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आल्यानंतर सध्या एक प्रश्न चर्चेत आहे. तो म्हणजे, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधली जाते. तुम्ही चित्रपटात पाहिले असेल की कोर्टात न्यायाधीशांच्या बाजूलाच एक मूर्ती ठेवण्यात आलेली असते व काळ्या कपड्यांच्या मदतीने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आलेली असते. तर, एका हातात तराजू आणि तलवारदेखील असते. या न्यायमूर्तीला जगभरात न्यायदेवता म्हणजेच लेडी जस्टिस नावाने ओळखले जाते. असं म्हटलं जातंय की, ही मूर्ती न्याय व्यवस्था दर्शवते.
डोळ्यावर पट्टी का?
न्यायदेवतेच्या हातात तलवार आणि डोळ्यांवर पट्टी असणे याची अनेक कारणे आहेत. न्यायमूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी असण्याचे कारण या गोष्टींचे संकेत दर्शवते की, न्यायालयात होत असलेल्या लढ्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. श्रीमंत-गरीब, लहान-मोठा कोणांमध्येही भेदभाव केला जाणार नाही. न्याय करताना दोन्ही पक्षाकडून जबाब व साक्षीपुराव्यांबद्दल ऐकल्यानंतरच निष्पक्ष न्याय केला जाणार आहे.
तराजूचा अर्थ काय?
जस्टिस ऑफ गॉडच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार असते. मिस्त्रमध्ये तराजूला न्यायाचे प्रतीक मानले जाते. जेणेकरुन न्याय करताना कोणावरही अन्याय होणार नाही याचे ते प्रतिक असते.
न्यायदेवतेची मूर्ती भारतात कुठून आली?
न्यायाची देवी ही एक प्राचीन ग्रीक देवी आहे. जी न्यायाचे प्रतीक असल्याचे म्हटलं जाते. तिचे नाव जस्टीया असं असून त्यांच्या नावावरुनच न्याय हा शब्द तयार झाला आहे. ही मूर्ती ग्रीसमधून ब्रिटनमध्ये पोहोचली तर 17व्या शतकात ब्रिटीश अधिकाऱ्याने ती पहिल्यांदा भारतात आणली. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर आपणही न्यायदेवतेचा स्वीकार केला.