Why School Bus Colour is yellow?: शाळेची स्कूल बस आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. या स्कूलबसमधल्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. आपल्या स्कूलबसचा रंग (School Bus) का कायम पिवळा असतो त्यामुळे कुठेही सिनेमात किंवा प्रत्यक्ष ठिकाणी पिवळ्या रंगाची बस (Yellow car bus) पाहिली की आपल्या लक्षात येते की ही स्कूल बसचं आहे. ट्रॅफिकमध्ये (Traffic) कुठे अडकलो असू तर मध्येच स्कूलबस जाताना दिसली की आपल्या स्कूलबसच्या आठवणी जाग्या होतात. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की स्कूलबसचा रंग हा नेहमी पिवळाच का असतो त्यातून त्याची रचनाही खूप सारखीच असते. त्याद्वारा आपल्याला कायमच स्कूलबस ही पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांमध्ये दिसते, अगदी कालपिलीप्रमाणे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुमच्या-आमच्या जीवनातील ही स्कूलबस नेहमी पिवळ्या रंगाचीच का असते. (why the colour of school bus is always yellow here is the interesting answer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामागचं मुळ हे अमेरकेत आहे. हाऊ स्टफ वर्क्स (How Stuff Works) या एका वेबसाईटनुसार आलेल्या माहितीवरून असे कळते की, अमेरिकामध्ये या पिवळ्या बसची प्रथम सुरूवात झाली होती. कोलंबिया विश्व विद्यालयाच्या शिक्षकांनी याबद्दल असाच एक निर्णय घेतला होता. ही घटना 1930 मधली आहे ज्यावेळी कोलंबिया विद्यापीठाच्या (Columbia University) शिक्षकांनी स्कूल बसचा रंग कोणता असावा यावर निर्णय घेतला होता. त्या काळी वाहने आणि ट्रॅफिकवरून कुठलेच कायदे नव्हते. त्यामुळे एका बसमधून जर मुलं जात असतील तर ती बस त्या लहान मुलांचीच आहे ना याची खात्री करण्यासाठी आणि त्यासाठी म्हणून काही तरी प्रयत्न करणे गरजेचे होते. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचललणं महत्त्वाचे होते. यासाठी कोलंबिया विश्व महाविद्यालयातील (Professor Frank Cyer) प्रोफेसर फ्रॅंक सायर यांनी संशोधन करण्यास सुरूवात केली.  


काय निघाले संशोधनातून? 


तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पिवळा रंग जर गाडीला दिला तर ही लहान मुलांच्या शाळेची स्कूलबस (School Bus news) आहे हे ओळखण्यास मदत होईल. यासाठी यांनी एक मिटिंग भरवली ज्यात त्यांनी सगळे इंजिनिएयर्स आणि ट्रान्सपोर्ट ऑफिसर्ससोबत आणि कायदेव्यवस्थापकांसोबत या मुद्यावर मिटिंग केली आणि त्यानंतर काही रंगांचे सॅपल्सही आणले होते. त्यांच्या समोर असे अनेक सॅपल्स ठेवले होते ज्यात सगळे रंग ठेवले होते. त्यातील काही लोकांनी नारंगी रंगाला प्राधान्य दिलं. तर अनेक लोकांनी पिवळ्या रंगाला पसंती दिली. 


पिवळा रंगच का? 


वरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की वेगवेगळे रंग ठेवलेले असतानाही मीटिंगमध्ये उपस्थित लोकांनी पिवळ्या रंगालाच प्राधान्य दिले. तर का? या प्रश्नाच्या उत्तरामागे एक वैज्ञानिक कारण आहे. तुम्ही त्यांच्या जागी असता तर तुम्हीही पिवळ्या रंगालाच सेलिक्ट केले असते. पिवळा रंग हा व्हझिबिलिटी स्पेक्ट्रममध्ये (Visibility Spectrum) सर्वात टॉपला असतो. आपल्या डोळ्यात फोटोरिप्सेप्टर नावाचे सेल असते ज्यातून आपल्याला रंग ओळखण्यास मदत होते.