मुंबई : गोवा सरकारी हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये मे महिन्यात मध्यरात्री रूग्णांचा मृत्यूची सर्वाधिक नोंद झाली आहे. यावर कमिटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. यावेळी रात्री 2 ते पहाटे 6 वाजेपर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन सिलेंडर बदलतना रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यांनतर सरकारने दिलेल्या आदेशानुसार, तीन सदस्यीय टीम तयार करण्यात आली. यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएमसीमार्फत रूग्णांची योग्य काळजी घेतली गेली नाही. यावेळी अनेक चुका देखील झाल्या. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुासर, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. 


अहवालानुसार, ऑक्सिजन ठेकेदाराने खाजगी रुग्णालयांमधून जीएमसीला माहिती न देता ऑक्सिजन देणे बंद केले, ज्यामुळे जीएमसीवर रुग्णांचा ओढा वाढला. दुसरीकडे, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले की, 'या अहवालामुळे मृत्यूचे कारण काय होते हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात भाजपला 'किलर' म्हणणे योग्य आहे. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो की ऑक्सिजनमुळे मृत्यू होतात. आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.


विधानसभेत याविषयावर होणार चर्चा 


दुसरीकडे, विरोधी पक्ष गोव्यातील दोन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करू शकतात. यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, 10 मे ते 13 मे या कालावधीत गोव्याच्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात रात्री 2 ते पहाटे 6 या दरम्यान सलग तीन दिवस रुग्णांचा मृत्यू झाला. अंधारात मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय टीमची स्थापनाही केली होती, ज्याने आता आपला अहवाल सादर केला आहे.