मुंबई:  काळ बदलतोय त्यानुसार जीवनशैलीही बदलत आहे. महिलाही त्यामध्ये मागे राहिल्या नाहीत. आता महिला कमवतात नोकरी करतात स्वत:च्या पायावर उभ्या राहतात आणि तेवढंच आपलं आयुष्य जगण्यासाठी धडपड करतात. धकाधकीच्या या आयुष्यात महिलांबद्दल मात्र एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. हे वास्तव दारू आणि महिला याचं वास्तव सांगणारं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणी नैराश्य आल्यावर दारूमध्ये गुंततं तर कोणी मजा म्हणून तर कोणी आपली दु:ख विसरण्यासाठी व्यसनाचा आधार घेतं अशा काही घटना समोर आल्या आहेत. मात्र आता मै हो गयी टल्ली म्हणणा-या महिलांची संख्या वाढत चालली आहे. 



दारु पिणा-या महिलांची संख्या दुप्पट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर दारु पिण्यात महिलांनी पुरुषांना मागे टाकलं आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार ही माहिती समोर आली आहे.


ग्रामीण भागात दारू पिणा-या महिलांची संख्या अडीच टक्क्यांवरुन पाच टक्के झाली आहे.  तर दारू पिणा-या पुरुषांची संख्या 41टक्क्यांवरुन 30 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. 15 वर्षांवरच्या दारू पिणा-या महिलांची संख्या 2016 मध्ये अडीच टक्के होती.


महिलांची ही संख्या 2021 मध्ये ४ टक्के झाली आहे.  ओडिशामध्ये तर ग्रामीण भागातल्या 4 टक्के महिला दारू पितात तर शहरात दीड टक्के महिला दारू पितात असं सर्व्हेमधून समोर आलं आहे. 


फक्त दारुच नव्हे तर तंबाखू खाणा-या महिलांची संख्याही वाढलीय. 2016  मध्ये 17 टक्के महिला तंबाखू खात होत्या. पाच वर्षांत ही संख्या 26 टक्क्यांवर गेली आहे. महिलांमध्ये व्यसनं वाढत आहे. हे सांगणारी ही धक्कादायक आकडेवारी आहे. ती एवढी दारु का प्यायला लागली, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.