कानपूर : कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या भीतीनं कानपूरमध्ये एका डॉक्टरनं पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचा संशय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरमधील कल्याणपूर भागात ही घटना घडलीये. घटनास्थळी मिळालेल्या डॉक्टरच्या डायरीत ओमायक्रॉन सगळ्यांना मारणार आहे. आता मृतदेह मोजायचे नाहीत असं लिहिलंय. 


आरोपी डॉक्टर हा कानपूरच्या रामा मेडिकल कॉलेजमध्ये फॉरेंसिक मेडिसीन विभागाचा प्रमुख आहे. त्यानं आधी पत्नी आणि मुलांना चहातून गुंगीचं औषध दिलं त्यानंतर हातोडीनं वार करुन खून केल्याचा संशय आहे. 


या हत्याकांडानंतर त्यानं भावाला व्हॉट्स अॅप करुन माहिती दिली आणि तो फरार झालाय. गंगा नदीच्या अटल घाट इथं त्याचं शेवटचं मोबाईल लोकेशन सापडलंय.


 त्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याचा संशय आहे.. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे 9 रूग्ण 


दक्षिण आफ्रिकेतून आलेले 4 जण ओमायक्रॉनबाधित आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले 5 जण बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून. त्या सर्वांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं सांगण्यात आलंय. 


दक्षिण आफ्रिकेतून आलेले चारही जण एकाच कुटुंबातील आहेत. 25 नोव्हेंबरला ते दक्षिण आफ्रिकाहून आले होते. यामुळे देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता 22 झाली आहे. 


महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी... 


महाराष्ट्रात आणखी 7 जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय. पिंपरी चिंचवडमधल्या 6 जणांना तर पुण्यातल्या एकाला ओमायक्रॉन झालाय. 


तर पुण्यात फिनलंडहून आलेल्या एकाला ओमायक्रॉनची लागण झालीय. त्यामुळे महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण झालेत. 


पिंपरीतील 6 जणांवर जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे हे ओमायक्रॉन बाधित हाय रिस्क देशांमधून आलेले नाहीत. तसच लहान मुलांनाही ओमायक्रॉनची बाधा होत असल्याचं स्पष्ट होतंय.