बोंबला! बायकोला नवरा दुसऱ्या महिलेसोबत सापडला रेड हँड अन्... व्हिडीओ जोरदार व्हायरल!
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी काही व्हिडीओ तर आपल्याला खूप काही शिकवून जातात. सोशल मीडियावर (Social Media) नवरा बायकोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे घरात बायको असताना बाहेर दुसऱ्याच बाईशी विवाहबाह्य संबंध असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पत्नीन रंगेहाथ पकडलं आहे.
घरात बायको असतान बाहेर दुसऱ्याच बाईशी विवाह बाह्य संबध ( extramarital affair) ठेवणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. या लफडेबाज नवऱ्याचं लफडं त्याच्या बायकोनेच पकडलं आहे. या बाईने तिच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसह रेड हँड पकडले. यानंतर या महिलेने पतीला मारहाण केली आहे. एवढंच काय तर हॉटेलमध्ये नवऱ्याची धुलाई केली.
पतीची धुलाई करणारी ही महिला उत्तर प्रदेशात राहणारी आहे. नवऱ्याचे दुसऱ्या बाई सोबत विवाहबाह्य संबध असल्याची माहिती त्या महिलेला लागली होती. नवऱ्याच्या या अफेअरवर त्या महिलेली चांगलाच राग आला आणि तिनं त्याला धडा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने नवऱ्याचा पाठलाग केला. नवऱ्याचा पाठलाग करत ही महिला थेट उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका हॉटेलमध्ये पोहचली.
हॉटेलमधील एका खोलीत या महिलेचा नवरा थांबला होता. महिलेने डायरेक्ट या रुमवर धाड टाकली आणि नवऱ्याला दुसऱ्या बाईसह रोमान्स करताना रंगेहात पकडले. नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहून महिला चांगलीच संतापली. संतापाच्या भरात या महिलेनं पायातील चप्पल काढली आणि नवऱ्याला मारहान केली. यावेळी नवऱ्यासह असलेल्या महिलेवर देखील तिने हात उगारला. बराच वेळ हॉटेलमध्ये हे सुरु होतं. हॉटेलच्या स्टाफने मध्यस्थी करत हे गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी कसंबसं त्यांनी हे थांबवलं.