Crime News : प्रेमासाठी लोक कोणत्या थराला जातील, काही सांगता येणार नाही. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधून समोर आली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये (Bihar muzaffarpur) एक हृदयद्रावक घटना घडली. बायकोने प्रियकरासह मिळून नवऱ्याची चाकूने हत्या केली. कुढनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अख्तियारपूर परिया या गावात ही घटना घडली आहे. बायको आणि तिच्या प्रियकराने मिळून नवऱ्याचा खेळ खल्लास केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिया गावातील (Bihar Crime News) रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांपर्यंत नवरा बायकोमध्ये सर्व काही सुरळीत चाललं होतं. मात्र, काही दिवसांनंतर बायको गावात राहणाऱ्या शेजारच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघेही एकमेकांना गुपचूप भेटू लागले.


एके दिवशी नवऱ्याला या प्रेमप्रकरणाची (wife love affair with neighbor) माहिती मिळाली आणि त्याने याला विरोध केला. नवऱ्याच्या विरोधानंतर देखील महिलेने प्रियकराला भेटणं सोडलं नाही. यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे होत होती. या भांडणाला कंटाळून पत्नीने प्रियकरासह हत्येचा कट रचला.


नवरा बायको घरी एकटे झोपायचे. याच गोष्टीचा फायदा घेत एके दिवशी रात्री बायकोने प्रियकराला भेटण्यासाठी घरी बोलावलं. त्यानंतर दोघांनी हत्येचा कट (husband punished for protesting) रचून दारात झोपलेल्या नवऱ्याचा चाकूने गळा कापला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपी आपापल्या घरी झोपायला गेले.


मुलासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अक्षय कुमारला जन्मठेपेची शिक्षा


दरम्यान, मृतदेह पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी या संबंधित माहिती माध्यमांना दिली आहे. हत्येप्रकरणी बायकोला आणि शेजारच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.