Crime News In Marathi: पत्नी तलावात बुडत होती मात्र पती एकाच जागेवर उभा राहून पत्नीचा मृत्यू होण्याची वाट पाहत बसला होता. अखेर तलावात बुडून पत्नीचा मृत्यू झालाय हे लक्षात येताच नराधम पतीने बनाव रचून पत्नीच्या मृत्यूची वेगळीच कहाणी रचली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा गावातील आहे. पतीनेच पत्नीची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी संध्याकाळी जवळपास 8 वाजता ही घटना घडली आहे, किमत राज मीणा आणि त्याची पत्नी कुसुम हे दोघ त्यांच्या गावातून दुचाकीवर निघाले होते. तेव्हा रस्त्यातच त्यांची बाइक स्लीप झाली. बाइक खाली पडल्यानंतर कीमत राज तिथेच खाली कोसळला तर, त्याची पत्नी थोड्यादूर असलेल्या तलावात पडली. पत्नी तलावात पडल्यानंतर पतीने जोरजोरात आरडाओरडा करुन मदत मागण्याचा बनवा केला. मात्र, शक्य असूनही तो तिला वाचवण्यासाठी गेला नाही. त्यामुळं पत्नीचा तलावात बुडून मृत्यू झाला. 


कीमत राजचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावत घटनास्थळी आले. पण तोपर्यंत पत्नीचा मृत्यू झाला होता. लोकांनी लगेचच याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी ग्रामणी स्थानिकांच्या मदतीने पत्नीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पती कीमत राज यांनी जेव्हा पोलिसांना घटनाक्रम सांगितला तेव्हाच पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. कीमत राज यांने सांगितल्यानुसार, पत्नी ज्या तलावात पडली होती त्याची खोली 10 फूट होती. त्यामुळं तो तिला वाचवू शकला नाही. 


पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा मात्र तलाव 10 फूट खोल नसून 4 फुटच खोल होता. कीमत राज त्याच्या पत्नीला सहज वाचवू शकला असता. तसंच, पत्नीने जीव वाचवण्यासाठी धडपड केल्याचेही पुरावे पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळं पोलिसांचा पतीवर संशय बळावला. जेव्हा पोलिसांनी मृत महिलेच्या माहेरच्यांना कळवले तेव्हा त्यांनीही पतीवरच हत्येचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे. 


कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कुसूमचे लग्न कोइंबतुर येथे रेल्वे विभागात कामाला असलेल्या कीमत राजसोबत 2 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 10 लाख रुपये हुंड्यात दिले होते. मात्र, त्यांची मागणी वाढतच होते. त्याचबरोबर, कुसुमच्या आई-वडिलांनी पतीवर अन्य गंभीर आरोपही केले आहेत. 


किमत राजचे त्याच्या लहान भावाच्या पत्नीसोबत अनैकित संबंध आहेत. पत्नी कुसुमने त्याला अनेकदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. यावरुन त्यांच्यात वादही झाले होते. मात्र तरीही तो ऐकायला तयार नव्हता, असं कुसूमच्या वडिलांनी सांगितले.