नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सुरु असलेल्या नापाक हरकतींवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


पाकिस्तान विकृत विचारांचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंसराज अहिर म्हणाले, 'पाकिस्तान विकृत विचार करतो आणि त्याच्या १ गोळीचं उत्तर १० गोळ्यांनी दिलं जाईल. भारतात दहशतवाद्यांना पाठविण्यासाठी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. हा त्यांचा स्वभाव बनला आहे. आमचं गृह मंत्रालय असो, संरक्षण मंत्रालय किंवा जम्मू-काश्मीर पोलीस, प्रत्येकजण समन्वय साधून पाकिस्तानला उत्तर देतो.'


१ गोळीला १० गोळींनी उत्तर


'पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आपण गोळीबार आधी नाही केली पाहिजे. पण त्या बाजुने जर १ गोळी चालली तर आपण १० गोळ्या चालवल्या पाहिजे. भारतीय सैनिक आपल्या नागरिकांना वाचवत आहेत आणि पाकिस्तान कधीच नाही बदलू शकत हे सत्य आहे. असं देखील अहिर म्हणाले.