व्हिस्कीमध्ये थंड पाणी का गरम पाणी मिक्स करावं? वाईन एक्स्पर्ट काय सांगतात? या मागे आहे सायन्स
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाइनमध्ये मिसळलेल्या पाण्याचं तापमान हे खूप महत्वाचं असतं.
Whiskey Chilled Water : व्हिस्की (Whiskey) किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या दारूमध्ये (alcohol) पाणी मिसळावं की नाही, यावरून अनेकदा वाद होताना दिसतो. मुख्य म्हणजे अनेक वाईन (Wine) तज्ज्ञ असं मानतात की, हार्ड ड्रिंक्सना त्यांच्या मूळ रूपातच एन्जॉय केलं पाहिजे. भारत आणि आशियाई देशांमधील लोकांच्या टेस्ट पॅलेटमुळे इथल्या ड्रिंक्सचा दर्जा आणि हवामानामुळे, पेयांमध्ये पाणी मिसळणं अगदी सामान्य गोष्ट आहे.
यावेळी लोकं केवळ पाणीच नाही तर ज्यूस, सोडा तसंच एनर्जी ड्रिंक्सचा वापर करतात. दारूच्या कडू चवीचा स्वाद बॅलन्स करण्यासोबतच हे शरीराला हायड्रेटही ठेवतं.
अनेक लोकं व्हिस्कीमध्ये थंड पाणी मिसळून पिणं पसंत करतात. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाइनमध्ये मिसळलेल्या पाण्याचं तापमान हे खूप महत्वाचं असतं. वाइनची चव, फ्लेवर यावर त्याचा मोठा परिणाम होतो. पाण्याच्या तापमान समजणाऱ्या व्यक्तींच हार्ड ड्रिंकच्या फ्लेवरला योग्य पद्धतीने जाणून घेतात.
व्यक्तीचं टेस्ट बड्स ते द्रवपदार्थांच्या वेगवेगळ्या तापमानांवर विविध पद्धतीने प्रतिक्रिया देतात. त्यामुळे चव ही व्यक्तीला वेगळ्या प्रकारे समजून येते.
तज्ज्ञांच्या मते, खाणं-पिणं थंड झाल्यावर टेस्ट बड्स (स्वाद ग्रंथी) त्यांची चव नीट समजू शकत नाहीत. जेवण तसंच पेय गरम झाल्यावरच चांगली चव किंवा फ्लेवर कळतो, असं मानलं जातं. यामुळेच गरम बिअरची चव कडू असते, तर थंडगार बिअर पिणं कठीण नसतं.
पाण्याचं तापमान किती असावं?
वाइन एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, टेस्ट बड्स (स्वाद ग्रंथी) 15 ते 35 डिग्री सेंटिग्रेट तापमानादरम्यान चांगल्या पद्धतीने काम करतं. 35 डिग्री तापमानावर टेस्ट बड्स (स्वाद ग्रंथी) पूर्णपणे खुली होतात आणि गोष्टी चाखल्यानंतर त्याची चव मेंदूपर्यंत पोहोचवतात.
ज्यावेळी ड्रिंक्स किंवा खाण्याच्या गोष्टींचं तापमान 15 डिग्रीपेक्षा कमी असते तेव्हा टेस्ट बड्स (स्वाद ग्रंथी) मेंदूंला स्पष्ट संदेश पाठवू शकत नाहीत. त्यामुळे चवीबद्दल नीट माहिती मिळू शकत नाही. याचाच अर्थ पेय पूर्णपणे थंड प्यायल्याने तुमची टेस्ट पॅलेट एका प्रकारे शांत करेल आणि फ्लेवर्स समजणार नाहीत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हिस्कीची योग्य चव जर जाणून घ्यायची असेल तर पाण्याचं तापमान हे खोलीच्या तापमानापेक्षा थोडं जास्त असलं पाहिजे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)