आग्रा : मंगळवारी आग्रा येथे एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. पोलिसांनी दंड आकारल्याने नाराज झालेल्या वायरमन चक्क पोलीस ठाण्यातील लाईटच कापली. पोलीस स्टेशनचं ६ लाखांचं बिल थकीत आहे. पण हे प्रकरण काही वेळेतच सोशल मीडियावर व्हायरल झालं. या नंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. बराच वेळ पोलीस स्थानकात वीज गायब होती. काही वेळेने अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर पोलीस स्टेशनचं कनेक्शन पुन्हा जोडण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी दुपारी हा सर्व प्रकार घडला. फिरोजाबादच्या लेबर कॉलनीमध्ये कार्यरत असलेल्या वायरमन आपल्या गाडीवर निघाला होता. रस्त्यात पोलिसांची चेकींग सुरु होती. हेलमेट नसल्यामुळे पोलिसांनी त्याला ५०० रुपयांचा दंड थोटावला. यानंतर नाराज झालेला वायरमन थेट आपल्या कार्यालयात गेला आणि एसडीओला याबाबत माहिती दिली.


लाइनमनने संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान पोलीस स्थानकाची लाईट कापली. तसेच ६.६६ लाखांचं थकीत बिल दंडासोबत दिलं. ही गोष्ट बाहेर येताच एकच खळबळ उडाली. वायरमनचं म्हणणं आहे की, त्याने एसडीओंच्या परवानगीनंतरच पोलीस स्थानकाची लाईट कापली.


'पोलिसांकडून मनमानी पद्धतीन दंड आकारला जात आहे. ४ महिन्यापासून पगार झालेला नाही. वायरमन दंड कसा भरणार.' असं एसडीओ रनवीर सिंह यांनी म्हटलं.