जयपूरः महिला मांत्रिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे दोन व्यावसायिकांनी एक कट रचला. प्लान यशस्वी होण्यासाठी त्यांनी दरोडेखोरांच्या टोळक्याची मदत घेतली. मात्र घडलं भलतंच आणि सगळा घोळ झाला. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन व्यावसायिकांनी महिला मांत्रिकाच्या मदतीने मित्राला धडा शिकवण्यासाठी कट रचला. महिला मांत्रिकाने सांगितल्यानुसार, यादराम मौर्य यांच्या घरात ६०० कोटी रुपये दडवून ठेवले आहेत. तसंच, हे पैसे कुठे आहेत याचीही माहिती तिने त्यांना दिली होती. त्यानुसार दोघांनी एका दरोडेखोरांच्या टोळीला त्या घरात दरोडा टाकण्याची सुपारी दिली. मात्र, चोरांनी दरोडा टाकल्यानंतर वास्तव मात्र वेगळंच निघाले.


मित्राला फसवण्याचा प्लान


यादरामचे त्याच्या दोन भागीदारक रामेश्वर राठी आणि रामदयाळ मीणा यांच्यासोबत जमिनीवरुन वाद सुरू होता. त्यामुळं रामदयाळ आणि रामेश्वर यांनी महिला मांत्रिकक शीबा बानो यांच्याकडून सल्ला घेतला. पण शीबा बानो हिने दोघांनाही खोटी कथा रचून सांगितली, मांत्रिकेने सांगितल्यानुसार, यादरामच्या घरात ६०० कोटी रुपये असल्याचे सांगितले. पैशांबाबत कळताच दोघांच्याही डोक्यात एक भयानक प्लान आकार घेऊ लागला.



मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचले, पण अचानक घडलं असं काही की नवरदेवाचा झाला मृत्यू


दरोडेखोरांची मदत घेतली


पैशाच्या लोभापायी आरोपी रामदयाळ आणि रामेश्वर यांनी एक प्लान आखला. त्यांनी दरोडेखोरांच्या टोळीशी संपर्क केला. त्यानंतर दरोडेखोरांनी १२ मेच्या मध्यरात्री यादराम मौर्य यांच्या घरात घुसखोरी करत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना बांधून ठेवले होते. तर, यादरामला चाकूचा धाक दाखवत ६०० कोटी रुपयांबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनीयाबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. पण तरीही ते यादराम यांना मारहाण करत ६०० कोटींबाबत विचारु लागले. 


जमिनीच्या आत ६०० कोटी लपवल्याचा दावा


महिला तांत्रिकने सांगितल्यानुसार ६०० कोटी जमिनीच्या आत दडवून ठेवले असल्याचा संशय त्यांना आला. म्हणून दरोडेखोरांनी किचन, बेडरुम आणि हॉलच्या टाइल्सदेखील उखाडून टाकल्या. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. ६०० कोटी लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी पिकअप गाडी आणली होती. मात्र हाती काहीच लागलं नसल्याने जाता जाता त्यांनी काही किंमतीचे दागिने आणि रोकड घेऊन गेले. 


मंगलाष्टक सुरू होत्या, इतक्यात नातेवाईकांनी नवरीला असं काही सांगितले की तिने थेट लग्नच मोडले


पीडित यादरामने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी त्याच्या भागिदारांबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर पोलिसांनी मांत्रिक शीबा बानोसह दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली आहे.