शाळेत न जाता, वर्षभर आराम! तरी पगार फुल… कोण आणि कुठे आहे ही शिक्षिका?
अशी कुठली शाळा आहे जिथे एक दिवस काम करते शिक्षिका आणि वर्षभर आराम, तरी तिला पूर्ण पगार मिळतो. कोण आहे ही शिक्षिका आणि काम न करता दिला पूर्ण पगार कसा मिळतो, काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.
सरकारी नोकरी मिळाली म्हणजे दोनही हात तुपात असा लोकांचा समज आहे. त्यात शिक्षकाची नोकरी म्हटलं की, सरकारी नोकरी, तगडा पगार, सुट्ट्या आणि निवृत्तीनंतर पेन्शन...भारतात असंख्य तरुण तरुणी शिक्षण क्षेत्रात येत असतात. सध्या जी बातमी समोर आली आहे. ते ऐकून तर तुमच्या डोकंच चक्रावेल. एक दिवस काम आणि वर्षभर आराम करुनही महिनाचा पगार मात्र पूर्ण बँकेत जमा होतोय आणि तोही एका शिक्षिकेला दिला जातोय. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
आश्चर्य वाटलं ना, पण झालं असं की, गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेची मुख्याध्यापका अनेक वर्षांपूर्वीत अमेरिकेतील शिकागो इथे शिफ्ट झाली आहे. पण गंमत बघा ना शाळेत ती अधिकृतपणे कागदपत्रावर अजूनही आहे. त्यामुळे तिच्या बँक खात्यात आजही महिनाचा पगार बरोबर एक तारखेला जमा होता. यासंदर्भात शाळेतील इतर शिक्षकांनी तक्रार केली आहे. पण अद्याप त्यावर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
गेल्या 8 वर्षांपासून पगार मिळतोय...!
मिळालेल्या माहितीनुसार, बनासकांठामधील अंबाजीमधील पाचा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावनाबेन यांच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड आहे. भावनाबेन पटेल गेल्या 8 वर्षांपासून शिकागो, अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. असे असतानाही अंबाजीच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून भावनाबेन पटेल यांचं नाव आजही नोंदवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं वेतनही विभागाकडून न चुकता त्यांना देण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भावनाबेन पटेल वर्षातून एकदा भारतात येतात. पण त्या दिवाळीच्या सुट्ट्यामंध्ये गुजरातमध्ये येत असल्याने शाळा बंद असते. अशा परिस्थितीत त्यांना ना मुलांना शिकवावं लागतं ना शाळेत जावे लागतं. तरीही त्यांना पगार दिला जातो. भावनाबेन यांच्या विरोधात लेखी तक्रार प्रभारी आचार्य यांनी अधिकाऱ्यांना दिली असून याबद्दल सत्यता तपास करण्यात येत आहे.
असे असतानाही अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थितीत होतोय. यासंदर्भात माहिती देताना प्रभारी आचार्य पारुलबेन सांगतात की, 'भावनाबेन 2013 पासून शिकागो इथे स्थायिक झाल्या आहेत. त्या दिवाळीच्या सुट्टीतच येतात आणि सरकारी पगार घेतात. ही बाब माझ्या लक्षात येताच मी माझ्या अधिकाऱ्यांना या वास्तवाची माहिती दिली, जेणेकरून मुलांचं शैक्षणिक नुकसान टाळता येईल.'
या दिवशी गेल्या होत्या शाळेत शेवटच्या
या प्रकरणात, प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणतात की, भावनाबेन 25 जानेवारी 2023 रोजी शाळेत गेल्या होत्या. त्यानंतर 1 जानेवारी 2024 पासून ते पगार न घेण्याच्या अटीवर रजेवर आहेत. शाळा भेटीदरम्यान ही बाब निदर्शनास आल्यानंतर भावनाबेन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याचे शिक्षण विभागाला कळविण्यात आल्याच समोर आलंय.