मुंबई : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे... पॅन आधारकार्डाला जोडल्याशिवाय तुमचं आयकर परताव्यासाठी तुम्ही फाईल करी शकणार नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचा टीडीएस कापला गेला असेल किंवा तुम्ही जास्त टॅक्स भरला असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये रिफंड क्लेम करता येईल. यासाठीही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे. 


त्यामुळे, तुम्ही जर पॅन कार्ड अद्याप आधार कार्डशी लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला रिफंडसाठी दावा करता येणार नाही... आणि अर्थातच तुमच्या खिशाला याचा चांगलाच फटका बसू शकतो.