मुंबई : Woman Attacked Bus Driver : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बसमध्ये चालकाला मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणाची सत्यता समजल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर महिलेवर जोरदार टीका केली. यासोबतच आपण महिला असल्याचा चुकीचा फायदा घेत असल्याचेही या टिकेत म्हटले आहे.


आयपीएस अधिकाऱ्याने ट्विट केला हा व्हिडिओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला असून कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बसमध्ये घुसून चालकाला मारहाण करताना दिसत आहे. महिलेने ड्रायव्हरची कॉलर पकडली असून ती त्याला खूप शिवीगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वप्रथम एका स्थानिक पत्रकाराने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला होता.
 
यानंतर IPS  अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'महिलेने ड्रायव्हरला मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे, हे निंदनीय आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि महिलेची सत्यता सांगत आहेत. या प्रकरणातील संपूर्ण चूक महिलेची असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ पाहा-



विजयवाडा, आंध्र प्रदेशचा व्हिडिओ


रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एक महिला चुकीच्या बाजूने स्कूटीवरून जात होती. त्याचवेळी त्या बाजूने एक सरकारी बस जात होती. त्यानंतर स्कूटी बसला धडकली. यानंतर महिलेचा पारा चढला आणि ती बसमध्ये चढली. त्यानंतर तिने दे दणादण करत चालकाला मारहाण करू लागली. व्हिडिओमध्ये ती महिला बस ड्रायव्हरची कॉलर पकडून धमकावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला ड्रायव्हरला ओढत आहे. त्याच्या शर्टाला हात घातला आहे.