मुंबई : कानपूर येथे शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमियोला महिला पोलिसांनी चांगलाच चोप दिला. ही घटना कानपूरमधील बिठूर भागात घडली. मुलींना शाळेत जाताना छळ केल्याप्रकरणी एका महिला कॉन्स्टेबलने या रोडरोडमियोला चपलेने मारहाण करत चांगलीच अद्दल घडवली. देशात अनेक ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. दरम्यान, हैदराबाद एन्काऊंटरनंतर कारवाईचे समर्थन होत असताना अनेकांकडून असा कायदा हातात घेऊ नये, चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेत जाणाऱ्या मुलींची छेडकाढत असताना महिला पोलिसाच्या निदर्शनास आले. त्यानंतर या महिला कॉन्स्टेबलने रोडरोमियोला चांगलाच चोप दिला. कानपूरच्या बिठूर परिसरात शाळेत चाललेल्या शाळकरी मुलींना दररोज हा रोडरोमियो छेडत होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने या रोडरोमियोला चांगलाच दम दिला. मात्र, त्याचा माज कमी होत नव्हता. मुलींची छेड काढतोस काय, असे विचारत भर रस्त्याच चांगला चोप दिला. 


मंगळवारी सकाळी बिठूर येथे पोलिसांच्या अॅन्टी रोमियो टीमने तपास मोहीम अभियान सुरु केले होते. या दरम्यान सोहदे येथे शाळेत जाणाऱ्या मुलींकडे पाहून वाईट कमेंट करत त्यांना त्रास देणारा हा युवक दिसून आला. त्यावेळी महिला कॉन्स्टेबलने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चांगलीच धुलाई केली.