चेटकीण समजून गावकऱ्यांची मारहाण, महिलेचा मृत्यू
आग्राच्या डौकी गावाl बुधवारी एका विधवा महिलेला ग्रामस्थांनी चेटकीण समजून मारहाण केली ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी २ लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आग्रा : आग्राच्या डौकी गावाl बुधवारी एका विधवा महिलेला ग्रामस्थांनी चेटकीण समजून मारहाण केली ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी २ लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मंगळवारी रात्री ६२ वर्षीय मानदेवी रात्रीला शौचासाठी जात असतांना अंधारामुळे त्या भरकटल्या आणि बघेल समाजाच्या वस्तीत जाऊन पोहोचल्या. येथे एक मुलगी झोपली होती. पण अचानक तिचं लक्ष या महिलेकडे गेल्याने तिने आरडाओरड केली. सफेद साडीमध्ये असल्याने चेटकीण समजून गावकऱ्यांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी महिलेला रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयातून परत येत असतांना रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या भागात तणावाचं वातावरण आहे.