आंघोळ करताना महिलेचा धक्कादायक मृत्यू, `ही` चूक तुम्ही तर करत नाहीत ना?
Woman Died:
Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती झाली. यात गुदमरल्याने त्या बेशुद्ध झाल्या. बराच वेळ संतोषीदेवी बाहेर आल्या नाहीत. यानंतर घरच्यांनी त्यांना हाक मारली पण आतून कोणता प्रतिसाद आला नाही.
यानंतर घरच्यांची भीती वाढू लागली. शेजारच्यांना बोलावून कसेतरी बाथरूमचे गेट उघडले गेले आणि बेशुद्ध झालेल्या संतोषीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संतोषी या नगरात सहाय्यक म्हणून काम करत होत्या. त्यांना दोन मुली आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या घरामध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. संतोषीच्या मृत्यूने कुटुंबात खळबळ उडाली.
दम का गुदमरतो?
गॅस गिझर कार्बन मोनोऑक्साइड तयार करतो. बाथरूममध्ये योग्य वेंटिलेशन व्यवस्था नसल्यास, आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला गुदमरायला होऊ शकते. यात त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. वास्तविक, गॅस गिझर चालवल्याने आणि त्यातून निर्माण होणारा कार्बन मोनोऑक्साइड वायू शरीरात पोहोचतो आणि लाल रक्तपेशींना नुकसान पोहोचते. यामुळे हिमोग्लोबिन रेणू अवरोधित होतो आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह प्रतिबंधित होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थता, डोकेदुखी, विचार करण्याची क्षमता कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अनेक प्रकरणात लोक बेशुद्ध होतात आणि ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास त्यांचा मृत्यू होतो.
यावर्षी आतापर्यंत 5 महिलांसह 6 जणांचा मृत्यू
श्रीगंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात गरम पाण्यासाठी गॅस गिझरचा वापर अधिक केला जात आहे. यावर्षी आतापर्यंत बाथरूममध्ये आंघोळ करताना सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच महिला आणि मुलींचा समावेश आहे. आंघोळ करताना गरम पाण्याच्या वाफेमुळे ऑक्सिजन कमी होतो तर मोनोक्साईड त्याचा प्रभाव सोडतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे गॅस गिझर आतून न बसवता बाथरूमच्या बाहेर लावावेत जेणेकरून असे अपघात टाळता येतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.