कोलकाता: फेसबुकच्या माध्यमातून त्या दोघांचा डिजिटल संवाद सुरू असतानाच तिने धक्कादायक पाऊल उचलले. घटना आहे पश्चिम बंगालमधील. एका तरूणीने गळफास लाऊन आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी ही तरूणी फेसबुकवर लाईव्ह चॅट करत होती. आत्महत्येचा हा प्रकार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला आहे.


आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर लाईव्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, वय वर्षे १८ असलेली ही तरूणी सोनारपूरच्या बयेदेपरा परिसरात रहायची. आत्महत्या करत असताना ती फेसबुकवर लाईव्ह होती. तिचे एका व्यक्तीसोबत चॅटींग सुरू होते. हा व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड असल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्या केलेली तरूणी आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यात शनिवारी भेट झाली होती. या भेटीपासून ती प्रचंड संतापली होती. तसेच, घरी आली तरी तिचा संताप कायम होता. दरम्यानच्या काळात तिच्या बॉयफ्रेंडने तिला फोनही केला होता. घरी आल्यापासून तीने सर्वांशी अबोला धरला होता. ती शांत बसून राहिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांनी तपास सुरू केला


तरूणीच्या घरची स्थिती सर्वसाधारण आहे. तिची आई जवळच्या रूग्णालयात मोलकरणीचे काम करते. शनिवारी ६.३०च्या सुमारास त्या घरातून बाहेर पडल्या. काही वेळाने वडिल आणि भाऊही घराबाहेर पडले. नेहमीप्रमाणे सगळे सुरू असताना रविवारचा दिवस उजाडला. दरम्यान, रविवारी सकाळी ८ वाजले तरी मुलगी रूमच्या बाहेर आली नाही त्यामुळे घरातल्यांचा संशय बळावला. त्यांनी आज जाऊ पाहिले तर, मुलीने गळफास लावून घेतला होता, अशी माहिती पोलिसानी दिली.


पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात आत्महत्येपूर्वी तरुणी फेसबुकवर लाईव्ह असल्याचे पुढे आले आहे.