Uttar Pradesh Crime News : धावती बस आणि कार मध्ये अत्याचार झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आता मात्र, धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. रेल्वे टीसीने भयानक कृत्य केले आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी आरोपी  रेल्वे टीसीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशात ही घटना घडली आहे (Uttar Pradesh Crime News ).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये हा गुन्हा घडला आहे. राजघाट ते अलिगड रेल्वे स्थानकादरम्यान महिला अत्याचाराला बळी पडली. टीसीने त्याच्या एका साथीदारासह फर्स्ट एसी केबिनमध्ये हा गुन्हा केला. महिलेच्या तक्रारीवरून जीआरपीने टीसीला अटक केली आहे. त्याचबरोबर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. पीडीत महिला आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन प्रयागराजला जात होती.  या प्रवासदरम्यान तिच्यासह धक्कादायक कृत्य घडले आहे.


16 जानेवारी रोजी ही घटना घडले. मात्र,या महिलेने पाच दिवसांनंतर 21 जानेवारी रोजी चांदौसी जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटना घडल्यानंतर पीडिते महिलेने 20 जानेवारी रोजी संध्याकाळी रेल्वेच्या 139 क्रमांकाच्या कस्टमर केअरवर तक्रार नोंदवली होती. यानंतर मुरादाबादचे रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली. 


पीडित महिला रात्रीच्या वेळेस आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह संभलमधील चंदौसी रेल्वे स्थानकावरून सुभेदारगंज (प्रयागराज) येथे निघाली होती. यावेळी  चंदौसी रेल्वे स्थानकावर ती ट्रेनची पाहत असताना आरोपी टीसी राजू सिंह या महिलेजवळ आला. ट्रेन आल्यावर टीसीने महिलेला एसीच्या डब्यात बसण्यास सांगितले. मात्र, माझ्याकडे जनरलचे तिकीट आहे असे या महिलने टीसी सांगितले. मात्र, तरी देखील टीसीने या महिलेने एसी कोचमध्ये प्रवास करण्याची मुभा दिली.


ट्रेन सुरु झाल्यानंतर थोड्यावेळाने टीसी राजू सिंह आपल्या आणखी एका साथीदारासह या महिलेजवळ आला. महिलेच्या कुशीत झोपलेल्या दोन वर्षाच्या मुलाला टीसीने वरच्या सीटवर झोपवले. यानंतर राजूने या महिलेला खायला दिले. यानंतर चक्कर येऊ लागल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले. 


खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन टीसीने आपल्या साथीदारासह या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. शुद्धीत आल्यानंतर सर्व प्रकार या महिलेच्या लक्षात आला. यानंतर महिलेने रेल्वे हेल्पलाईनशी संपर्क साधला. यानंतर पतीसह जीआरपी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी टीसी राजू सिंह याला अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार फरार आहे.