नवी दिल्ली : साडी परिधान करुन दुचाकी चालवणं तोडं कठीण काम आहे. मात्र, बाईकसारखी टु-व्हीलर चालवणं म्हणजे मुश्किलचं आहे. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला चक्क साडी नेसून बाईक चालवत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


साडी परिधानकरुन चालवली बाईक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमधील एका महिलेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला चक्क साडी नेसून स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहे.


व्हिडिओ होतोय व्हायरल


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत साडी परिधान केलेली महिला यामाहा आर१५ ही बाईक हायवेवर चालवताना दिसत आहे. या बाईकवर दोन महिलाही बसलेल्या आहेत.


कारमधील युवकांनी रेकॉर्ड केला व्हिडिओ 


हायवेवर बाईक चालवत असलेल्या या महिलेचा व्हिडिओ कारमध्ये बसलेल्या युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिला यामाहा आर१५ बाईक चालवताना दिसत आहे.


व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याची कल्पानाही नाही 


बाईकवर दोन महिला आणि एक तरुणी असल्याचं दिसत आहे. ही महिला बाईक चालवत होती आणि आपला व्हिडिओ कुणीतरी रेकॉर्ड करत आहे याची तिला कल्पनाही नव्हती. त्यानंतर कारमधील युवकांनी हॉर्न वाजवला त्यावेळी त्या महिलेला व्हिडिओ शूट होत असल्याचं कळलं.


महिलेने बाईकचा स्पीड वाढवला


महिलेने पाहिल्यानंतर त्या युवकांनी तिचं कौतुकही केलं. हे तरुण जी भाषा बोलत आहेत ती तेलुगू असल्याचं कळतयं. हे तरुण व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं लक्षात येताच या महिलेने आपल्या बाईकचा स्पीड वाढवला आणि त्यांच्या कारला मागे टाकलं.



हा व्हिडिओ कधीचा आहे?, कुठल्या ठिकाणी शूट केला आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, हा व्हिडिओ पाहून आम्ही तुम्हाला सल्ला देत आहोत की, ट्रिपल सीट गाडी चालवू नका आणि हेल्मेट नक्की घाला.