Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या वादानंतर त्यांच्या 6 वर्षांच्या मुलाला कालव्यात फेकून दिले. या घटनेनंतर मुलाला शोधण्यासाठी गेलेल्या शोध पथकाला मुलाचा मृतदेह मगरीच्या जबड्यात असल्याचे दिसले. मुलाच्या मृतदेहाचा अर्ध्याहून अधिक भाग मगरीने खाल्ला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन महिला व तिच्या पतीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाला कालव्यात फेकून दिले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील हलामदी गावात ही घटना घडली आहे. येथे 32 वर्षीय महिला सावित्री आणि तिचा पती रवी कुमार (36) या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 वर्षांचा मुलगा विनोदला बोलता व ऐकता येत नव्हतं. तो सामान्य मुलांसारखं बोलू शकत नव्हता. यामुळं दोघा पती-पत्नीत सतत वाद होत होते. 


असंख्य मगर असलेल्या नदीत फेकले


सावित्री आणि रवि यांच्यात शनिवारी मुलावरुन खूप मोठा वाद झाला. त्यानंतर सावित्रीने रात्री जवळपास 9 वाजता मुलगा विनोद याला कालव्यात फेकून दिले. हा कालवा पुढे जाऊन काळी नदीला मिळतो. या नदीत असंख्य मगर आहेत. घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. मात्र, तरीही रात्री त्याचा शोध लागला नाही. 


14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी शोधपथकाने मगरीच्या जबड्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मगरीने मुलाचा उजवा हाताचा काही भाग खाल्ला होता. तर, त्याच्या शरीरावरही गंभीर जखमा होत्या. आरोपी दाम्पत्य राजमिस्त्री आणि मोलकरीण म्हणून काम करत होते. दोघांनाही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडित पाठवण्यात आले आहे. 


महिलेचा पतीवर आरोप 


महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या घटनेसाठी महिलेचा पती जबाबदार आहे. तो वारंवार म्हणायचा की मुलाचा मृत्यू होऊदेत. तो फक्त खातो. माझे पती सतत हेच म्हणायचे. माझा मुलगा किती अत्याचार सहन करणार. मी माझं दुख कुठे सांगायला जाऊ, असा आरोप महिलेने तिच्या पतीवर केला आहे.