Pressure Cooker Hacks: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याची काहीच खात्री नाही. कधीकधी सोशल मीडियावर एखादा ट्रेंडच सुरू होता. त्या ट्रेंडला धरुन अनेकजण तसेच व्हिडिओ अपलोड करतात. पहिले एखाद्या गाण्याचा किंवा डान्सचा व्हिडिओ व्हायरल व्हायचा. पण आता त्या व्यतिरिक्तही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही जुगाडू व्हिडिओदेखील रातोरात हिट होतात. अशाच एका काकूंचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. किचन टिप्स देणाऱ्या या काकुंचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही त्यांची फिरकी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका काकुंचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गॅसची बचत होण्यासाठी लोक निरनिराळे जुगाड करत असतात. मात्र, या महिलेने जी पद्धत वापरली आहे ती कमाल आहे. या आधी असी पद्धत ना तुम्ही कधी पाहिली असेल ना ऐकली असेल. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं आहे की ही टेक्निक भारताबाहेर जाता कामा नये. नेमकी काय आहे ही पद्धत? का या महिलेचा व्हिडिओ इतका व्हायरल होतोय? जाणून घेऊया. 


व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक महिला किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की ती गॅसच्या शेगडीवर एक कुकर ठेवून त्यात भाजी शिजवत ठेवली आहे. मात्र त्यानंतर या महिलेने हद्दच केली आहे. भाजी शिजत ठेवलेल्या कुकरवर महिलेने एक कढाई ठेवली आहे. त्यानंतर त्यात तेल टाकून ते गरम केले. तेल गरम झाल्यावर त्यात पुरी टाकून तळायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या पुऱ्या तळुनही झाल्या आहेत. व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर, काहींनी यावर सवाल उपस्थित करत महिलेला खरं खोटं सुनावलं आहे. 


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ rekha_sharma.001 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 4 दिवसाआधीच शेअर करण्यात आला आहे. याला 16.1 मिलियन म्हणजेच 1.6 कोटी लोकांनी आत्तापर्यंत पाहिला आहे. तर, 3 लाख 93 हजार लोकांनी याला लाइक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटदेखील केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, वो स्त्री है कुछ भी कर सकती है. तर एकाने म्हटलं आहे की हे खूप भयंकर आणि धोकादायक आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, महिलेने जरी कुकरवर कढाई ठेवून त्यात पुऱ्या तळल्या असल्या तरी हा जुगाड धोकादायक ठरु शकतं. अनेकांनी कमेंट करत यातील चुका आणि धोका सांगितला आहे. एकाने म्हटलं आहे की, कुकरमधील पाण्याच्या वाफेचे काय? अशा चुकीच्या युक्त्या दाखवू नका, तेवढ्या प्रमाणात तेल तापणार नाही पण दाबाच्या वाफांमुळे गरम तेल असलेली कढई खाली येईल. एकाने म्हटलं आहे की, कुकरच्या वाफेमुळं पुऱ्या तळता येऊ शकत नाही, हा फेक व्हिडिओ आहे.