My husband’s secret double life : फेसबुकवरून किंवा व्हाट्सऍपवरून आपले हरवलेले मित्र, मैत्रिणी भेटू शकतात. याच सोशल मीडियावरून अगदी हरवलेली मुलं किंवा आपले पाळीव प्राणीही सापडू शकतात. मात्र या बातमीत एका बायकोला फेसबुकवरून जे सापडलंय, ते वाचून कदाचित तुम्हालाही धक्का बसू शकतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या तब्बल 25 वर्षांनंतर महिलेला तिच्याच नवऱ्याबाबत एक धक्कादायक बाब समजली. बरं, ही बातमीही समजली फेसबुकवरून. या महिलेने आपलं फेसबुक अकाऊंट सुरु केलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या हक्काच्या नवऱ्याचं आणखी एक कुटुंब असल्याचं या महिलेला फेसबुकवरून समजलंय. 


लग्नाच्या तब्बल 25 वर्षांनंतर या महिलेला आपल्या नवऱ्याबाबत धक्कादायक माहिती समजली. आपल्याच नवऱ्याचं आणखी एक कुटुंब आहे. गेल्या 17  वर्षांपासून आपला नवरा एका दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनमध्ये असल्याचं तिला समजलं. या दुसऱ्या पार्टनरपासून आपल्या नवल्याला दोन मुलं असल्याचंही या महिलेला समजलं.  


Reddit पोस्टमध्ये या महिलेनेआपली ओळख लपवून आपल्या नवऱ्याने दिलेल्या धोक्याबाबत माहिती लिहिली आहे. "ही बाब समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला आहे. गेल्या 17 वर्षांपासून माझ्या नवऱ्याचं अफेअर सुरु आहे. आमचं लग्न 25 वर्षांपूर्वी झालेलं. आम्हाला 3 मुलं आहेत, त्यातील एक कॉलेजमध्ये, तर एक घरी असतो. मात्र माझ्या नवऱ्याची आणखी एक कुटुंबही आहे."


आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पार्टनरबाबत या महिलेने विविध खुलासे केले आहेत. आपल्या नवऱ्याची पार्टनर बायको इंश्युरन्स ब्रोकर आहे. म्हणून तिला अनेकदा प्रवास करावा लागतो. त्यामुळे ती एक आठवडा काम आणि एक आठवडा घरी असते, असा खुलासा महिलेने केलाय. 
 
सोशल मीडियावरून आपल्याला ही सर्व माहिती मिळाल्याचं महिला सांगते. खरंतर या महिलेने एक फेसबुक अकाउंट ओपन केलेलं. जेंव्हा तिने तिच्या नवऱ्याचं नाव फेसबुकवर सर्च केलं,  तेंव्हा तिला एक दुसरं प्रोफाइल एका दुसऱ्या आडनावाने सापडलं. या प्रोफाईलमध्ये नवऱ्याने दुसरी पार्टनर आणि त्या मुलांना लिंक केलेलं. माझा नवरा आताही दुसऱ्या कुटुंबासोबत आहे, हे मला ठाऊक आहे. हे त्याचेच प्रोफाईल आहे. कारण आपल्या नवऱ्याने नुकताच त्यांच्या दुसऱ्या मुलांसोबत डिनरचा फोटो शेअर केला आहे.   


या महिलेने पुढे म्हंटल आहे की, आपला नवरा फोटोंमध्ये त्याच्या दुसऱ्या पार्टनरला किस करतो. सोबत त्यांच्या मुलांचे त्यांच्यासोबतच फोटोही आहेत. ती मुलं माझ्या नवऱ्यासारखीच दिसतात, असंही ती म्हणते.  


double life of husband, women find out about his husbands wife, extra marital affair, relationship,


My husband’s secret double life.Husband’s double-life revealed after wife discovered his big secret on social media