नवी दिल्ली: वाहतूकीचे नियम पाळा असे वेळोवेळी आवाहन केले जात असले तरी अनेकजण याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामूळे अपघाती मृत्यूंच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मध्यप्रदेशातील तिकमगढ येत असाच एक भयानक अपघात झाला पण सुदैवाने यात कोणतीच जिवीतहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्येही कॅप्चर करण्यात आला आहे.
छोट्या रस्त्यावरर एक स्कूटर एसयूव्हीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या स्कूटरवर तीन महिला बसल्या आहेत. त्यांचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न फसतो आणि समोरुन वेगाने येणाऱ्या मारुती आर्टिका गाडीवर जोरदार आदळते. अपघात टाळण्यासाठी आर्टिकाचा चालक जलद ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो पण अरुंद रस्त्यामूळे स्कूटरला जागा मिळत नाही आणि त्यांची धडक झाली.
या धडकेत स्कूटरवर चालणाऱ्या तीन महिला हवेत उडतात आणि गाडीला सोडून जमिनीवर पडतात.



तीन महिलांपैकी दोन महिला अपघातानंतर लगेच उठतात. त्यानंतर शेजारची माणसे मदतीसाठी येऊन तिसऱ्या महिलेलाही स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो. या तिघींपैकी एकीनेही डोक्यात हेल्मेट घातले नव्हते.  एएनआयने या घटनेचा १६ सेकंदाचा व्हिडिओ पब्लिश केला आहे. त्यामध्ये हा थरार पाहायला मिळतो. महिलांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या जीवाला धोका पोहोचला नाही.