सिंहांच्या कळपामुळे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती
सिंहांचा कळप रस्त्यावर आल्यानं एका महिलेची रुग्णवाहिकेमध्येच प्रसुती झाली. गुजरातच्या अमरेलीमध्ये ही घटना घडलीय. 29 जूनच्या रात्री ही घटना घडलीय.
अमरेली : सिंहांचा कळप रस्त्यावर आल्यानं एका महिलेची रुग्णवाहिकेमध्येच प्रसुती झाली. गुजरातच्या अमरेलीमध्ये ही घटना घडलीय. 29 जूनच्या रात्री ही घटना घडलीय.
प्रसूतीसाठी एका महिलेला रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्यात येत होतं. त्याचवेळी वाटेत या रुग्णवाहिकेचा मार्ग सिंहाच्या कळपानं रोखला. बराच काळ सिंहांचा कळप काही केल्या रुग्णवाहिकेसमोर हटेना.
त्यामुळे रुग्णवाहिकेमधील महिलेची परिस्थिती आणखी बिघडली. तिला रुग्णवाहिकेमध्येच प्रसूतीवेदना सुरु झाल्या. यामुळे नर्सिंग स्टाफला रुग्णवाहिकेमध्येच या महिलेची प्रसूती करावी लागली.