तरूणीने लग्न पत्रिकेवर छापली पॉर्नहबची वेबसाइटची, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
लग्न पत्रिका छापण्याची हद्दच झाली, थेट पॉर्नहबच्या वेबसाईटची युआरएलचं दिली, जाणून घ्या काय आहे प्रकार?
मुंबई: आजकल लग्नाच्या पत्रिका हटके छापण्याचा ट्रेंडच आला आहे. नुकतंच एका कपलने मेडिसीनच्या टॅब्लेटवर लग्नपत्रिका छापली होती. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली होती. या लग्नपत्रिकेनंतर आता आणखीण एक हटके पत्रिका छापल्याचा प्रकार समोर आला आहे. तरूणीने थेट लग्नपत्रिकेवर पॉर्नहबची वेबसाइटचं छापली आहे. नेमकं तिने ही वेबसाईट का छापली ते जाणून घेऊय़ात.
टिकटॉकर स्क्विडवर्ड टेन्टेकल्स ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. यासाठी ती लग्नाच्या तयारीला लागली आहे. काहीच दिवसांपुर्वी तिने पत्रिकेचं डिझाईन फिक्स करून पत्रिका छापायला दिली होती. ही पत्रिका छापून आल्यानंतर तिने तिच्या नातेवाईतक आणि मित्र मंडळींना ही पत्रिका शेअर केली होती. त्यामुळे या लग्नामुळे ती खुप आनंदी होती.
पत्रिकेवर मोठी चुक
स्क्विडवर्ड टेन्टेकल्स यांनी पत्रिका वाटल्यानंतर त्याच्यात चुकीचा मजकूर छापल्याचं तिला निदर्शनाल आलं. तिच्या लग्नाच्या पत्रिकेत पॉर्नहबची वेबसाईटची लिंक छापण्यात आली होती. हीच लिंक असलेली पत्रिका वाटली गेली होती. मात्र ही घटना समोर आल्यानंतर तिला तिची चुक कळाली आणि तिने तिच्या कुटूंबियांची आणि मित्र-मैत्रिणींची माफी मांगितली.
अशी झाली चुक
स्क्विडवर्ड टेन्टेकल्सने याबाबतचा किस्सा देखील तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला, जेणेकरून इतर कोणीही अशाप्रकारची चुका करू नये. ही गोष्ट शेअर करण्यासाठी तिने एक व्हिडीओ तयार केला. त्यात तिने म्हटलंय, “आज मला माझ्या लग्नाच्या आमंत्रणाच्या पत्रिका मिळाल्या. मी खूपच उत्साहात आहे. मात्र मी एक खूप मोठी चूक केली आहे, जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला आशा आहे की यामुळे इतर नववधू ही चूक टाळतील, कारण ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. नंतर ती तिचा पत्रिकेवर कॅमेरा फिरवते. यामध्ये पत्रिकेवर एका पॉर्नहब साइटवर जाण्यास सांगितलं आहे.
स्क्विडवर्ड टेन्टेकल्सने सांगितले की तिने त्यांच्या लग्नासाठी योग्य युआरएल प्राप्त होईपर्यंत प्लेसहोल्डर म्हणून एका वेबसाइटचा वापर केला, परंतु कार्ड छापण्यापूर्वी ती ही यूआरएल काढून टाकण्यास विसरली. आरएसव्हीपी कार्डमध्ये असे लिहिले आहे: “लग्नाच्या अधिक तपशीलांसाठी, कृपया आमच्या पॉर्नहबची युआरएल टाकून वेबसाइटला भेट द्या. ही यूआरएल काढायची विसरल्याने ती तशीच्या तशीच पत्रिकेवर छापून आली. त्यामुळे तिची फारचं नाच्चकी झाली.
दरम्यान या घटनेनंतर तिने चुकीची आमंत्रण पत्रिका पाठवल्याबद्दल तिच्या मित्र आणि कुटुंबीयांची, विशेषतः तिच्या आईची माफी मागितली.