Women Shoot Reel On Airport Conveyor Belt: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यातही आता इन्स्टाग्रामसारख्या माध्यमावर काही तासांमध्ये एकादं रिल व्हायरल होत असल्याने अनेक भारतीयही वाटेल त्या माध्यमातून व्हायरल होण्याचा प्रयत्न करतात. अगदी आप सार्वजनिक ठिकाणी असून आपल्या हातून नियमांचं उल्लंघन होत आहे का याचंही भान लोकांना राहत नाही. बऱ्याचदा आपल्याला हे असे इन्फ्युएन्सर्स रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी नाचताना, गाताना दिसतात. हे इन्फ्युएन्सर्स तर आपल्या स्मार्टफोन्सला हल्ली शस्त्राप्रमाणे वापरतात. वाटेल त्या गोष्टी वाटेल त्या पद्धतीने शूट करुन काहीतरी हटके केल्याचं दाखवत व्हायरल होण्याचा यांचा प्रयत्न असतो. मात्र यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो हे ही खरंच आहे.


तळपायाची आग मस्तकात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरं ही व्हायरल होण्याची इच्छा अनेकांना स्वस्थ बसू देत नाही. ठिकाण आणि प्रसंग कोणताही असो आपण व्हिडीओ शूट करुन टाकला पाहिजे असं या इन्फ्युएन्सरला अनेकदा वाटत असतं. अर्थात सगळे इन्फ्युएन्सर्स असे नसतात तरीही सामाजिक भान नसलेल्यांचं प्रमाण यात अधिक आहे हे सुद्धा तितकेच खरे. त्यामुळेच खचाखच गर्दीने भरलेली ट्रेन असेल, मेट्रोल असेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी रहदारी अगदी बंद करुन रील शूट करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्येही असे रिल्स शूट केले जातात. या रिलवेड्यांचा अनेकांना आता भयंकर त्रास होऊ लागला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.


नेमकं काय केलं या तरुणीनं?


विमानतळावर प्रवाशांच्या बॅगा या कनव्हेअर बेल्टवरुन येतात त्यावर आधी बसून आणि नंतर अगदी लोळत एका महिलेने रिल शूट केलं आहे. एक्सवर सेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला कॅप्शन देताना, "हा व्हायरस विमानतळावरही पोहोचला" असं म्हटलं आहे. या व्हिडीओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र अशाप्रकारे इतरांना त्रास देऊन व्हिडीओ शूट केल्याचं पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.



लाखभर दंड करा


"हा विमानतळावरील सर्वाधिक गजबजाट असलेला आणि महत्त्वाचा परिसर असतो. अशा ठिकाणी ही रिल काढतेय आणि ते सुद्धा नियम मोडून. हिला दंड ठोठावला पाहिजे. अगदी लाखो रुपयांचा दंड हिच्याकडून आकरला पाहिजे," अशी प्रतिक्रिया एकाने नोंदवली आहे. "हा काय प्रकार आहे? किमान विमानतळावर तरी हे असले चाळे नको," अशी अपेक्षा अन्य एकाने व्यक्त केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं कमेंट करुन नक्की कळवा.