लखनऊ: पुरुषांची सत्ता उलथवून देशात महिलाराज आणा, असे आवाहन काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. त्या शुक्रवारी लखनऊमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांना राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले. महिलांना सत्ता मिळायला पाहिजे. मी महिलांना सांगू इच्छिते की, त्यांनी पुरूषांकडून सत्ता हिसकावून घ्यावी. यासाठी महिलांनी ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. जेणेकरून सत्ता तुमच्या हातामध्ये येईल, असे प्रियांका यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस आयुक्तांनी कथन केली हैदराबाद एन्काऊंटरची संपूर्ण कहाणी...


यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. उन्नावमध्ये गेल्या ११ महिन्यांत ९० स्त्रियांवर बलात्कार झाले. महिलांच्या तक्रारी ऐकूनच घेतल्या नाहीत, गुन्हेच नोंदवले गेले नाहीत, तर मग न्याय कसा मिळणार? त्यामुळे आता सरकार महिलांसोबत आहे की गुन्हेगारांबरोबर आहे, हे स्पष्ट झालेच पाहिजे, असेही प्रियांका यांनी सांगितले. 


ही अराजकता माजवण्याची पद्धत, पोलिसांच्या कारवाईचा निषेध- आंबेडकर



प्रियांका गांधी या सध्या लखनऊ दौऱ्यावर आल्या आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी प्रियांका यांनी अनेक बैठका घेतल्या. यावेळी काँग्रेस पक्षाची भविष्यातील रणनीती निश्चित करण्यात आली.