मध्यरात्री जाग येताच महिलेला बसला मोठा धक्का, बेडवर झोपला होता...
मध्यरात्री अचानक आली जाग, महिलेने बेडवर जे पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली
खंडवा : आजकाल हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये राहण्याचा ट्रेंड झालाय. एखाद्या दुर ठिकाणी जाण्याचा योग आला आणि राहण्यासाठी जागा नसल्यास अनेक जण वरील पर्यायाचा अवलंब करतात. मात्र अशाच पर्यायाचा वापर करण महिलेला महागात पडलंय. हॉटेलमध्ये झोपले असताना तिच्यासोबत जे घडलं ते पाहुन तिच्या पायाखालीच जमीन सरकली होती. नेमकी ही घटना काय होती, ती जाणून घेऊयात.
दोन महिला (women) रात्रीच्या वेळी एका हॉटेलमध्ये (hotel) रहावयास गेल्या होत्या. दिवसभराच काम आटपून रात्री आराम मिळावा यासाठी या दोघांनी शहरात घर नसल्याने हॉटेलचा मार्ग अवलंबला होता. दोघीही रात्री लाईट बंद करून झोपल्या होत्या. यानंतर अचानक एका महिलेला जाग आली, तिने बेडवर एका पुरुषाला (men) झोपलेले पाहताच तिला मोठा धक्का बसला होता.विशेष म्हणजे झोपताना या दोन महिला एकत्रच झोपल्या होत्या, मात्र पुरुष कसा रुममध्ये आला, असा प्रश्न त्यांना पडला होता. दरम्यान महिलांना रुमची लाईट ऑन करताच तो पुरूष फरार झाला.
या प्रकरणानंतर महिलांनी हॉटेल रिसेप्शनवर (Hotel reception) कळवत पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. पोलिस येताच हॉटेलच्या तळमजल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना रांगेत उभे करण्यात आले. यावेळी महिलांनी त्या आरोपीला ओळखले. यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन महिला (Two social worker women) समाजसेविका होत्या. त्या ज्या रूममध्ये झोपलेल्या त्या रूमच्या खिडकीतून घुसखोरी करत आरोपी पोहोचला होता. हा आरोपी जाऊन महिलेच्या बेडवर झोपला होता.या प्रकरणी महिला समाजसेविकांनी हॉटेलच्या वेटरवर गैरवर्तनाचा आरोप केला. पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवून वेटर बळीरामला ताब्यात घेतले तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान ही घटना मध्यप्रदेश (Madhy Pradesh) राज्यातील खंडवा येथे घटना घडली आहे. या घटनेने अनेक महिलांना धक्का बसला आहे.