नवी दिल्ली :  2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा असा स्पष्ट आदेश आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या खासदारांना दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी मोदींनी त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या खासदारांशी चर्चा केली. मतदार संघातल्या लोकांपर्यंत पोहचा. जीएसटीच्या अडचणी जाणून घ्या त्या मंत्रालयाला कळवा असंही मोदींनी भाजपच्या खासदारांना सांगितलं.  


मतदार संघातल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडग्यासाठी प्रयत्न करा असेही निर्देश यावेळी मोदींनी दिलेत.