नवी दिल्ली :  लवकरच बॅंकेच्या कर्मचार्‍यांनाही प्रत्येक शनिवार- रविवार सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंक कर्मचार्‍यांनाही पाच दिवसांचा आठवडा करण्याचा प्रस्ताव बनवण्यात आला असून त्यावर विचार करण्यात येत आहे. 


इंडियन बॅंक्स असोसिएशन (आयबीए) आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा व्हावा याकरिता प्राथमिक चर्चा झाली आहे. या महिन्यात या दोन्ही संघटनांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या प्रत्येक बँक कर्मचारी साधारणपणे साडे सहा तास काम करत आहे. 


'ग्राहकांसाठी अतिरिक्त वेळ द्यायला तयार आहोत. पण कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा दिला पाहिजे. सध्या बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी व प्रत्येक रविवारी सुट्टी मिळते. कामाचे तास वाढले तर कामगारांना प्रत्येक शनिवारीही सुट्टी मिळायला हवी', असे नॅशनल ऑर्गनायझेशनर ऑफ वर्कर्सच्या उपाध्यक्ष अश्निनी राणा यांचे मत आहे. 


   तर दुसरीकडे  बँकेमधील वाढती ग्राहकांची संख्या पाहता बँकेचे कामाचे तास वाढविले जावेत, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे पाच दिवस आठवड्याची मागणी पुढे आल्याचे सुत्रांनी सांगितले.



5 दिवसांचा आठवडा झाल्यास कोण कोणते बदल होतील ? 


  • ग्राहकांसाठी रोज सकाळी बॅंक 10 च्या ऐवजी 9.30 वाजता उघडण्यात येतील आणि संध्याकाळी 4 वाजता बंद होतील. 

  • केवळ 5 दिवस काम करून प्रत्येक शनिवार - रविवार बॅंक बंद राहील.