World Consumer Rights Day 2023 : हल्ली प्रत्यक्ष एखाद्या दुकानात जाऊन सामान खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी Online Shopping करण्याकडेच अनेकांचा कल दिसून येतो. या माध्यमातून खरेदी करताना एकतर वेळही वाचतो, शिवाय बसल्या जागी तुम्हाला ठिकठिकाणची उत्पादनं अगदरी सहज आणि माफक दरात खरेदी करता येणार आहेत. आम्ही ऑनलाईन शॉपिंगच करतो असं म्हणणारे अनेकजण तुमच्याही ओळखीत असतील. पण, खरंच ते त्यांच्या खरेदीनं 100 टक्के संतुष्ट असतात का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा आपण मागवलेली वस्तू आणि प्रत्यक्षात आपल्याला मिळालेली वस्तू यामध्ये बराच फरक असतो. किंबहुना अशाही घटना घडतात जेव्हा एखादी कंपनी चुकीची वस्तू पाठवल्यानंतर ती सहजासहजी परतही घेत नाही. मग नेमकं काय करावं? शांत रहावं? मुळीच नाही... 


एक ग्राहक म्हणून तुमचेही काही अधिकार आहेत. या अधिकारांनुसार कोणतीही कंपनी किंवा उत्पादक चुकीची उत्पादनं परत घेण्यास किंवा ते बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. यासाठी तुम्ही कंपनीला कोर्टातही खेचू शकता. 


नवा ग्राहक सुरक्षा कायदा काय सांगतो? 


अशाच प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी नव्या ग्राहक सुरक्षा कायद्यामध्ये ग्राहकांसाठी काही नव्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. जिथं Defective Product परत घेण्यास नकार देणं, पैसे परत न देणं हा ग्राहकांशी दुर्व्यवहार म्हणून ग्राह्य धरला जातो. 


कशी कराल तक्रार?


जर उत्पादक किंवा विक्री करणारा तुमच्या तक्रारींना उत्तर देत नसेल तर तुम्ही थेट राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाइनवर Consumer Complaint करू शकता. इथं तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरी म्हणजे ऑफलाईन पद्धत. 


हेसुद्धा वाचा : Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps  


 


प्रत्येक देश, जिल्हा आणि राज्य स्तरावर कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशनची सुविधा उपलब्ध आहे. जिथं तुम्ही तक्रार करु शकता. याशिवाय  1800114000 या क्रमांकावर फोन करत किंवा 8130009809 या क्रमांकावर एसएमएस करत किंवा Umang App च्या माध्यमातून तुम्ही तक्रार दाखल करु शकता. 


सदरील वादाच्या दोन वर्षांच्या आतच ग्राहक म्हणून तुम्ही Consumer Application फाईल करु शकता. दोन वर्षांनंतर तुम्हाला तक्रार दाखल करता येणार नाही आणि केल्यास ती तक्रार मान्य नसेल. ग्राहक सुरक्षा कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यासंबंधी तुम्हाला कोणतीही शंका असल्यास तुम्ही 1915 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्यामुळं ही माहिती लक्षात ठेवा आणि व्हा Smart Consumer.