World Cup 2023 : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा (Ind vs Aus) पराभव झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी त्याचे विश्लेषण केलं आहे. मात्र यामध्ये आता राजकारणी देखील मागे राहिलेले नाहीत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात पंतप्रधानांनी (PM Modi) हजेरी लावली होती. त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकारण झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्ल्डकपमधील पराभवावरून टीका करत त्यांना 'पनौती' म्हटलं होतं. आता याप्रकरणी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) याबाबत भाष्य केलं आहे. या गोष्टीमध्ये राजकीय अजेंडा आणू नये कारण मला या गोष्टी समजत नाही, असे शमी म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपनंतर मोहम्मद शमी त्याच्या गावी सहसपूर अलीनगर येथे पोहोचला होते. तिथे त्याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूने वर्ल्डकपवर पाय ठेवून फोटो काढल्याच्या प्रकाराबाबत भाष्य केलं. हे खरोखरच खूप वेदनादायी होतं, असे शमी म्हणाला. या गोष्टीमुळे मीसुद्खा दुखावलो आहे कारण ज्या वर्ल्डकपसाठी संपूर्ण विश्व संघ झगडत होता तो विश्वचषक जिंकल्यानंतर हा अपमान अजिबात योग्य नाही. यावेळी मोहम्मद शमीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले आणि गावाला स्टेडियम बांधण्याची घोषणा केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचे आभार मानले. ज्या काही उणिवा असतील त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. हे आमचे दुर्दैव होते ज्यामुळे आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही, असे शमी म्हणाला.


यावेळी शमीला राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीबद्दलही विचारण्यात आलं. मैदानावर एक षडयंत्र रचले गेले, त्यामुळे सामना गमावले, असे राहुल गांधींनी म्हटले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शमीने प्रतिक्रिया दिली आहे. "असले वादग्रस्त प्रश्न आम्हाला समजत नाहीत. मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. ज्या गोष्टीवर तुम्ही दोन महिने मेहनत केली आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. यामध्ये राजकीय अजेंडा आणू नये. मला हे सर्व समजत नाही," असेह मोहम्मद शमी म्हणाला.



"तुमच्यात जे टॅलेंट आहे ते ओळखा. जेव्हा मी इथून गेलो होतो तेव्हा तुम्हालाही माहिती होतं की परिस्थिती काय होती. मी खूप मेहनत करुन हे यश मिळवलं आहे. आता तुमच्याकडे सुविधा असतील तर फक्त मेहनतीची गरज आहे. मी हेच सांगेल की तुम्ही ध्येयाकडे लक्ष्य द्या," असेही शमी म्हणाला.


नेमकं काय घडलं?


राहुल गांधी एका प्रचारसभेत बोलत असताना गर्दीतून लोक पनवती असं ओरडू लागले होते. त्यानंतर राहुल गांधी हसत म्हणाले की, "आपली मुलं वर्ल्डकप जिंकले असते. पण तिथे पनवती आले आणि हरवलं. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला माहिती आहे". राहुल गांधींनी यावेळी नरेंद्र मोदींचं नाव घेणं टाळलं होतं. पण नंतर त्यांनी दुसऱ्या एका सभेत PM म्हणजे 'पनवती मोदी' असं म्हटलं.