मुंबई: जागतिक पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जात आहे. पर्यावरण दिनाचे निमित्त साधून जगभरात पर्यावरण कसे धोक्यात आहे. यापुढची आव्हाने काय असतील याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. भारतही जगभरातील देशांप्रमाणे पर्यावरणाच्या गंभीर मद्द्यावर लढत आहे. कारण, गेल्या काही वर्षांपासून भारतालाही पर्यावरणीय बदलाचे चटके बसत आहेत. हे चटके स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही बसत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) जाणून घेऊया भारतापुढे असलेली पर्यावरणासंबंधीची पाच आव्हाने..


जलवायू प्रदूषण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांमध्ये भारत प्रचंड प्रगती करत आहे. पण, त्याचा दुष्परिणाम पर्यावरणावर होत आहे. जलवायू प्रदूषण गेल्य काही वर्षांपासूनचा ऐरणीवरचा मुद्दा. तापमानवाढ आणि बिघडलेले पावसाचे गणीत हेसुद्धा बदलत्या पर्यावरणीय बदलाचेच कारण आहे. काही ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी तर, काही ठिकाणी कोरडा ठाक दुष्काळ. पर्वतीय प्रदेशात वाढत्या उष्णतेमुळे वारंवार वितळत जाणारे बर्फ आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर त्यामुळे जंगले आणि जलचर प्राण्यांवर होणारे परिणाम. त्यातून मानवी जिवनाला निर्माण होणाऱ्या समस्या हे एक प्रमुख आव्हान येत्या काळात असणार आहे.


प्रदूषण


आजघडीला देशातील एकही नागरिक असा नाही जो प्रदुषणामुले त्रस्त नाही. देशाला प्रदुषणाचा मोठा विळखा पडला आहे. मग हे प्रदुषण हवेचे, पाण्याचे, किंवा जमिनीचे असे कोणतेही असो. अनैसर्गिक शेती, कारखाने, प्लास्टिकचा अतिवापर, उंचच उंच उभारले जाणारे इमारतींचे टॉवर अशी एक ना अनेक कारणे प्रदुषणामागे आहेत. यावर सर्वांना विचारपूर्वक तोडगा काढावा लागणार आहे.


वाढती लोकसंख्या


अनेकांना असे वाटू शकते की, लोकसंख्या वाढण्याचा प्रदूषणाशी काय संबंध आहे. पण, कोणत्याही ठिकाणावरची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली की त्या ठिकाणचे भौगोलिक गणित बिघडलेच म्हणून समजा. जागतिक लोकसंख्या सध्या सुमारे ७.६च्या घरात पोहोचली आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक चांगले जिवनमान देऊ इच्छित असाल तर, तुम्हाला जमीन आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवावेच लागेल. 


जैव विविधता


ही सृष्टी एक चक्र आहे. या सृष्टीतील प्रत्येक जीवाची स्वत:ची म्हणून एक अशी खास भूमिका आहे. मग तो जीव मानव असो किंवा एकादा सूक्ष्म जिवाणू. प्रेत्येकाची गरज या सृष्टीला आहेत. पण, विकासाच्या नावाखाली जी शहरं उभारली जात आहेत, वाढवली जात आहेत ती पाहता परिस्थीती प्रचंड कठीण दिसते. शहरं आणि विकासाच्या नावाकाली झाडं तोडली जात आहेत. जंगलं उद्ध्वस्त केली जात आहेत. याचा परिणाम उदाहरण म्हणून जरी घेतला तरी दिसते की, मधमाशांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे फुलांचे परागकण विखुरले जात नाहीत. त्यामुळे फुला, फळांमध्ये बिजारोपन होत नाही. परिणामी नवी झाडे लागून निघण्याचे प्रमाण कमी होते. अशी ही आव्हाने येत्या काळात निर्माण झाली आहेत.