मुंबई: आत्मनिर्भर भारतानं जगाला कोरोना काळात दाखवून दिलं. कोरोनावरची लस भारतानं तयार केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांच्या भुवया उंचावल्या. भारतानं कोरोना लसीच्या निर्मितीबाबत जी कामगिरी केली त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं पाठ थोपटली आहे. लसनिर्मितीत भारतानं जी गती दाखवली त्याचं कौतुक WHOनं केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना लस निर्मितीत भारतानं जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून क्षमता प्राप्त केली असं जागतिक आरोग्य संघनेनं सांगितलं. भारताचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत असंही नमुद केलं. संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना काळातल्या भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.


भारताने कोव्हिड 19 विषाणू प्रतिबंधक लशीचा जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून मिळवलेली क्षमता आणि वेळोवेळी नवप्रवर्तनाचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड काळातील भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.


Corona Vaccination : २९ खासगी रुग्णालयांत लसीकरणाला परवानगी; वाचा संपूर्ण यादी


कोरोना साथीविरोधातील लढाई आता महत्त्वाच्या टप्प्यात असून अचानक युरोप आणि अमेरिकेत रुग्ण पुन्हा वाढत आहेत. लसीचे परिणाम कसे होत आहेत याचा अभ्यास बारकाईनं करणं गरजेचं आहे. किमान ३० कोव्हिड 19 प्रतिबंधक लशी सध्या भारतात विविध टप्प्यावर असून कोव्हॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस बायोटेकची आहे. तर ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या पुण्यातील कंपनीने कोव्हिशिल्ड नावाने तयार केली आहे. 


झायडस कॅडिलाची एक लस असून रशियाच्या स्पुतनिक 5 लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. ही लस रेड्डीज लॅबोरेटरी तयार करीत आहे. या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. भारताने वेगवेगळ्या देशांना लसीचा पुरवठा केला असून नीती आयोगाचे आरोग्य सदस्य विनोद पॉल यांनी वैज्ञानिक समुदायाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.


धक्कादायक! कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू


करोना विषाणूवर लशी तयार करण्यात भारताने तत्परता दाखवली असे त्यांनी म्हटले आहे.  आपण वेगाने लशी तयार करू शकतो आणि त्याचे वितरणही करू शकतो हे यातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितलं.


भारतात गेल्या 24 तासांत 14,989 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 13,123 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 98 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 1,70,126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.